लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचे वतीने तपासणी करून महाराष्ट्रातील प्रत्येक डिप्लोमा कॉलेजचा शैक्षणिक दर्जा नुकताच ठरवून दिलेला आहे. यामध्ये लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्या सर्व अभ्यासक्रमांना “उत्कृष्ट दर्जा ” (एक्सलन्स) प्राप्त झाला असल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी यांनी दिली.
ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या (डिप्लोमा) संस्थांमधील शैक्षणिक बाबींची तपासणी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी समिती पाठवून प्रत्येक पॉलिटेक्निकची तपासणी केली. तपासणी करतांना संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोईसुविधा, प्राध्यापक, शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, शैक्षणिक वातावरण इत्यादी बाबींचा विचार करून गुण दिले आहेत. या तपासणीमध्ये पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हील, क्लाऊड कॉम्प्यिटींग अँण्ड बीग डेटा, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल तसेच इंटरेरियर डिझाईन अँण्ड डेकोरेशन या विभागांना उत्कृष्ठ दर्जा (एक्सलन्स ग्रेड) प्राप्त झालेला आहे. संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन तसेच प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेले परिश्रम व प्रयत्नांचे हे यश असल्याचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी यांनी सांगितले. राज्यातील सर्व पॉलिटेक्निकची या प्रकारच्या वर्गवारीची माहिती विद्यार्थी व पालक यांना पाहण्यासाठी तंत्रशिक्षण मंडळाच्या www.msbte.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पॉलिटेक्निकच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले.
ग्रामीण भागात पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरु केलेल्या या पहिल्या महाविद्यालयांमुळे तांञिक शिक्षणांतून सर्वसामान्य जनतेची हजारो मुले-मुली आज सरकारी नोकरी बरोबररचं जागतिक पातळीवर पोहचले आहेत. नोकरी बरोबरचं स्वयंरोजगारांमध्ये ही या महाविद्यालयांने अव्वल स्थान मिळविल्याने आणि तंत्रशिक्षण मंडळातर्फे प्रवरेच्या विखे पाटील पॉलिटेक्निकला “ उत्कृष्ठ दर्जा प्राप्त झाल्याने मोठा फायदा विद्यार्थ्याना होणार आहे.