8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

भंडारदरा ८० टक्के , तसेच मुळा धरण देखील ५२ टक्के भरले पाणलोट क्षेत्रात पावसांची संततधार सुरू असल्याने भंडारदरा धरण १५ आँगस्ट पूर्वी भरणार

अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):- भंडारदरा व मुळा नदीपाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे भंडारदरा ८० टक्के भरले आहे. तसेच मुळा धरण देखील ५२ टक्के भरले आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रात पावसांची संततधार सुरू असल्याने भंडारदरा धरण १५ आँगस्ट पूर्वी भरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुळा नदी व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.शुक्रवारीही या परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. यामुळे यावर्षीची २९ हजार ५३३ क्युसेसची सर्वाधिक पूर पातळी काल गुरुवारी मुळा नदीने ओलांडली. नदीच्या पूर पातळीमुळे मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून २६००० दलघफू क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता १२,९८० दशलक्ष घनफूट पार गेला असून सकाळी या धरणातील पाणीसाठा ५१ टक्क्यांच्या पुढे गेला.

 

धरणाकडे सकाळी सहा वाजता कोतूळ येथून २९ हजार ५३३ युसेस विक्रमी आवक सुरू होती व सकाळी नऊ वाजता २०,८२८ युसेस आवक सुरू होती. तर सायंकाळी सहा वाजता आवक कमी होऊन ती ९,५४१ वर आली. रात्री ११ वाजता विसर्ग १११५२ दलघफू झाला आहे. जोरदार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. संततदार पावसाने परिसरातील जनजीवन गाठून गेले आहे. आदिवासी भागात उर्वरित भात लावण्या अंतिम टप्प्यात आहे.

ओढे नाले ओसंडून वाहत आहे निसर्ग ओलाचिंब झाला आहे. ओढे नाले सक्रिय झाल्याने परिसरातील सौंदर्य मिळण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे भर पावसात पावसाचा आनंद घेण्यासाठी फोफसंडी व हरिश्चंद्रगड परिसर पर्यटकांना खुणावत आहे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी घाट माथ्यावर पर्यटक रेंगाळताना दिसत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!