3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

‘लोकसभेत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका’ राहुरीत पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांची कार्यकर्त्यांना तंबी 

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम सुरु करा. येणाऱ्या काळात विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला तुम्‍हाला तेवढ्याच ताकदीने उत्‍तर देण्‍याचे काम करायचे आहे. पुढील साठ दिवसात प्रत्‍येक गावापर्यंत योजना पोहोचविण्‍याचे काम संघटीतपणे करा, विधानसभा निवडणूकीत महायुतीलाच यश मिळेल, असा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने जिल्‍ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्‍तीकेंद्र प्रमुख यांची एकत्रित बैठक राहुरी येथे संपन्‍न झाली.

या बैठकीला प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्‍हा सहकारी बॅकेंचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, वैभव पिचड, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष विठ्ठलराव लंघे, दिलीप भालसिंग, शहर जिल्‍हाध्‍यक्ष अॅड. अभय आगरकर, महिला जिल्‍हाध्‍यक्षा अर्चना थोरात, कांचन मांढरे, जेष्‍ठनेते सुभाष पाटील, नानासाहेब पवार, नितीन दिनकर, अरुण मुंढे, सत्‍यजीत कदम, बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, लोकसभेत पराभव स्विकारावा लागला असला तरी, देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले. याचा सर्वांना अभिमान आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने केलेल्‍या नकारात्‍मक प्रवाराला आपण उत्‍तर देण्‍यास कमी पडलो. ही चुक पुन्‍हा होवू द्यायची नसेल तर, केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजना प्रभावीपणे प्रत्‍येक गावामध्‍ये पोहोचवा. सोशल मिडीयावर कोन काय चर्चा करते यापेक्षा या योजनांचीच माहीती लोकांपर्यंत पोहोचविली तर, विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला ते प्रभावी उत्‍तर होवू शकेल असे ना. विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

डॉ. सुजय विखे पाटील म्‍हणाले की, विधानसभा निवडणूका जिंकायच्‍या असतील तर, सर्वांना मोठे मन ठेवावे लागेल. राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार आणण्‍यासाठी प्रत्‍येक आमदारा आपला महत्‍वाचा आहे. लोकसभा निवडणूकीत केवळ अपप्रचार झाला. कोन काय भाषणबाजी करतयं याला माझ्या दृष्‍टीने महत्‍व नाही, मात्र कार्यकर्त्‍यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशासतसे उत्‍तर देण्‍यास मागेपुढे पाहू नका. तुमच्‍या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे त्‍यांनी कार्यकर्त्‍यांना आश्‍वासित केले.

महामंत्री विजय चौधरी यांनी महायुती सरकारमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मात्र केवळ विरोधी बाजू पुढे आणून सरकारला बदनाम करणारे चार वेळा मुख्‍यमंत्री होते, त्‍यांना मराठा समाजाला न्‍याय देता आला नाही. लोकसभा निवडणूकीत धार्मिक तेढ निर्माण करुन, महाविकास आघाडीने विजय मिळविला असला तरी, विधानसभा निवडणूकीत नियोजनबध्‍द पध्‍दतीने आपल्‍याला सामोरे जावे लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले, आ. मोनिका राजळे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कारगील विजय दिनानिमित्‍ताने शहिद जवानांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!