लोणी( जनता आवाज वृत्तसेवा) :-शिर्डी मतदारसंघातील अपघातातील तीन मयत वारकऱ्यांच्या वारसांना त्याचबरोबर रस्ता आणि विजेचा धक्का लागल्याने मयत झालेल्या तीन जणांच्या वारसांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी दोन लाखाचे सानुग्रह विमा योजना रकमेच्या धनदेशाचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिर्डी ते आळंदी पायी दिंडीतील वारकरी यांचा संगमनेर जवळील चंदनापुरी येथे अपघात झाला होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अपघातातील जखमी वारकऱ्यांना मोफत उपचार यावेळी दिले होते.
परंतु यातील कनकुरी येथील भाऊसाहेब जपे, कोर्हाळे येथील ताराबाई गमे आणि शिर्डी येथील बबन थोरे हे मयत झाले होते. मोटार अपघातामध्ये पिंपळस येथील हिराबाई कुदळे, विजेच्या धक्का लागल्याने नांदूर्खी बुद्रुक येथील संजय खरात आणि रस्ता अपघातामध्ये राहुल वाघमारे हे मयत झाले होते.
या सर्वांच्या वारसांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अपघातग्रस्त शेतकरी वारसदार, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, कृषी अधिकारी तुळशीराम जाधव उपस्थित होते.
शिर्डी मतदार संघात जनसेवा फाउंडेशन अंतर्गत विविध शासकीय योजना सुरू आहेत येथील नागरिकांना लाभ देण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोठी मदत होत असते. या सर्व शेतकरी अपघातातील वारसांना एकूण रुपये बारा लाखाचे सानुग्रह अनुदान वितरित झाले आहे.