3.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

करंजीत विवाहित महिलेची आत्महत्या

करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील एका विवाहित महिलेने रविवार दि. 28 जुलै रोजी आत्महत्या केल्याने या संदर्भात तिघांवर पाथर्डी पोलिसात काल, सोमवारी गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली.   

या घटनेबाबत काकासाहेब नामदेव जराड (रा. शेडे चांदगाव, ता. शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुझ्या वडिलांनी लग्नावेळी हुंडा दिला नाही. त्यामुळे वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत मयत वैष्णवी महेश भावले हीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आत्महत्येस प्रवृत्त केले.

मयत मुलीचा पती महेश बाबासाहेब भावले, सासु मंदा बाबासाहेब भावले (रा. करंजी) व नातेवाईक राजू नाथा वीर (रा. बोधेगाव) या तिघाविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात महिन्यापूर्वीच वैष्णवी आणि महेश भावले यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर काही दिवसातच आर्थिक देवाण-घेवाणीवरून झालेला वाद आणि त्या वादातून या विवाहित युवतीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या या घटनेमुळे मुलीच्या नातेवाईकांनी देखील मोठा रोष व्यक्त करत सोमवारी अंत्यविधी प्रसंगी सासरच्या काही व्यक्तींना चांगलीच मारहाण केली.

या आत्महत्याच्या प्रकरणासंदर्भात मयत वैष्णवीचा पती महेश भावले यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर हे करत आहेत.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!