16.3 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे यांचा उपक्रम

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हार भगवतीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व रुग्णांना फळ व शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अनिल बांगरे यांच्या पुढाकारातून प्रतिवर्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी गोरगरीब व रुग्णांना मिठाई व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येते. यावेळीही ही परंपरा कायम राखली.

याप्रसंगी कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्र व जि. प. शाळेत वाटप करण्यात आले. यावेळी नगर उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, आकाश बांगरे, किसन कापसे, वसंतराव लबडे, शिवसेना शहरप्रमुख विजय भोर, शिवसेना तालुका संघटक संतोष जोर्वेकर, विजय गोहर, धनंजय घोरपडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!