23.7 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठीआगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी साथ द्यावी – मा. आमदार चंद्रशेखर घुले पा.

पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-मला विधानसभेत काम करण्याची आपण एकदा संधी दिली.त्या संधीचे सोने करीत आपण त्याचे विकास कामात रूपांतर केले.अद्याप देखील अनेक सोयी सुविधांपासून माणिकदौंडी परिसर वंचित असून मूलभूत सुविधा सह आजच्या युगातील आधुनिक सेवा येथील नागरिकांना मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करू.यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.

तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील चेकेवाडी,आल्हनवाडी, काकडदरा तांडा,सत्रे वस्ती,खरात वस्ती आदी ठिकाणी भेटी देऊन मा.आ.घुले पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ताठे,चांद मणियार,उत्तम पवार,सचिन पवार,साहेबराव चव्हाण,अंकुश पवार,विष्णू पवार,सुरेश पवार,राम पवार,साहेबराव पवार,गोविद राठोड,रामेश्वर कर्डिले,मच्छिंद्र पवार,दिगंबर पवार,दत्तात्रय पवार,विठ्ठल पवार,श्याम पवार,बाळू पवार,मुरलीधर भगत आदी ऊपस्थित होते.

यावेळी विविध गावच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षात विकास कामे ठप्प झाली आहेत.यामुळे आम्हाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तरी आपण या भागातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांना केला.

पुढे बोलताना मा.आ.घुले पाटील म्हणाले की,दिवसेंदिवस जागतिक स्तरावर अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत.मात्र या परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही.मूलभूत सेवा सुविधा पासून हा भाग अद्यापही वंचित आहे.माझ्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळामध्ये वीज,पाणी,रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून विकास कामाचा पाया रचला.यानंतर मात्र माणिकदौंडी परिसरात काही भरीव काम झालेले दिसत नाही.आगामी काळात आपण सर्वांनी साथ द्यावी विकास कामाच्या माध्यमातून या परिसरातील चेहरा मोहरा बदलण्याचे काम आपण करू असे घुले पाटील म्हणाले.

माणिकदोंडी परिसरातील दुर्गम भागातील वाड्या तांड्यावर मा.आ.घुले यांनी विद्युत उपकेंद्राची उभारणी करून स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज उपलब्ध करून दिली होती. याची जाणीव ठेवत काकडदरा तांड्यावरील महिलांनी घुले पाटील यांचे औक्षण केले.तर अबाल वृद्धांनी स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!