3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनो स्वतःमध्ये वाचनाची आवड निर्माण करा – उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ

करंजी( जनता आवाज वृत्तसेवा): शिक्षण महर्षी रावसाहेब म्हस्के यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले आणि खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचे विचार ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मोबाईलची नव्हे तर वाचनाची आवड निर्माण करावी असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्री.नवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण महर्षी रावसाहेब म्हस्के यांच्या 47 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून उपजिल्हाधिकारी निर्मळ बोलत होत्या.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पुणे विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख,माजी सभापती मिर्झा मणियार,उपसरपंच सुनील अकोलकर,प्राचार्य संजय म्हस्के,पर्यवेक्षक एस.बी.पेटकर,आदर्श शिक्षक स्वप्निल लवांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच मुलामुलींनी नेहमी मोठी स्वप्न पहा.देश निर्मितीसाठी उच्च शिक्षण घेण्याची गरज असुन इस्राईल सारख्या देशात केवळ दोन टक्के पाऊस पडतो.तरी तेथील शेतकरी खुप कष्ट करून शेती क्षेत्रात यशस्वी झाला आहे.तसेच प्रयत्न आपल्या शेतकरी बांधवांनी सुद्धा करावेत.मनामध्ये वाचनाची आवड निर्माण करा.छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आई-वडिलांचा आदर्श समोर ठेवून अपयशाचा विचार न करता नेहमी यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असे पुणे विभागाचे उद्योग उपसंचालक स्वप्निल देशमुख यावेळी म्हणाले.या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!