श्रीरामपूर (प्रतिनिधी ):- श्रीरामपूर शहरात बिंगो आणि मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने श्रीरामपुरात चार ठिकाणी छापेमारी करत मुद्देमालसह अनेक जणांना अटक केली आहे.
श्रीरामपूर येथे मोरगे वस्ती जवळ असलेला नॉर्दन बँक जवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये टीव्ही स्क्रीनवर बिंगो नावाचा जुगार खेळत चालू होता. या ठिकाणी पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले. एलसीबी चे पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव यांच्या फिरतीवरून विक्रांत सोमनाथ देशमुख, साईराज हेमंत चिटणीस, अक्षय दादासाहेब गांगुर्डे, अल्ताफ सय्यद यांच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम1887 चे कलम 12 नुसार श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दुसरे ठिकाण पोलीस कॉन्स्टेबल मनोहर गोसावी यांच्या फिर्यादीवरून योगेश भाऊसाहेब चव्हाण, साईबाज फकीर मोहम्मद कुरेशी, अश्फाक अहमद शेख यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरे ठिकाण शहर बस स्टॅन्ड समोर एका पत्र्याच्या शेडमध्ये मुन्ना नावाचा हर्जित जुगार खेळत असताना दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक गुलाब अडांगळे व काळूराम सदाशिव राक्षे या दोघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चौथं ठिकाण मोरगे वस्ती परिसरातच आहे या ठिकाणी टीव्ही स्क्रीन वर बिंगो नावाचा जुगार खेळताना काही जणांना पकडण्यात आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे यांच्या फिर्यादीवरून अफरोज अन्वर शेख, रवी बाळासाहेब चव्हाण यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 अ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



