4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

शुक्रवारी आश्वी मध्ये अमृतवाहिनी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन खा. निलेश लंके, खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा भव्य नागरी सत्कार आमदार थोरात ,आमदार तांबे यांची उपस्थिती

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील नागरिकांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. आश्वी बाजार तळ येथे होणार असून यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खा.निलेश लंके यांचा भव्य नागरिक सत्कार काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सुधाकर जोशी म्हणाले की, अमृतवाहिनी सहकारी बँकेने शेतकरी, सभासद ,सर्वसामान्य नागरिक, व्यापारी या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला असून या बँकेच्या तालुक्यात अमृतनगर, संगमनेर, बोटा, तळेगाव, साकूर येथे अद्यावत शाखा कार्यरत आहेत. याचबरोबर नागरिकांच्या आग्रहास्तव आश्वी बुद्रुक येथे नवीन शाखेचा उद्घाटन समारंभ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वा. बाजार तळ येथे होणार आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा भव्य नागरिक सत्कार ही आश्वी बुद्रुक व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने होणार आहे.

याप्रसंगी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,सौ दुर्गाताई तांबे, कृषी भूषण सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रभावतीताई घोगरे, रणजितसिंह देशमुख ,इंद्रजीत भाऊ थोरात, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

यावेळी संगमनेर तालुका व आश्वी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी आश्वी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन ॲड .नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी, सर्व संचालक मंडळ ,आश्वी येथील सत्कार समितीचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ,सोसायटीचे सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ आणि सुमतीलाल गांधी यांच्या वतीने करण्यात आले आहे

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!