कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) : –कोल्हार बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर वाघमारे यांची शिक्षण शिक्षण क्षेत्रातील कार्य नेहमी प्रेरणादायी असल्याने प्रतिपादन स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी केले आहे.
राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर विष्णू वाघमारे यांची रयत शिक्षण संस्थेमधून सुमारे ३४ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती व शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला.
कोल्हार बु. येथील तांत्रिक कार्यशाळा, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य अरूण गायकवाड व टी. डी. एफचे जनरल सेक्रेटरी हिरालाल पगडाल हे होते.
भिमराव आंधळे (जन. बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था, सातारा), मनोज कवडे (जन. बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था, सातारा), प्रमोद तोरणे (सह. विभागीय अधिकारी उत्तर विभाग), अजित मोरे (स्थानिक स्कूल कमिटी सदस्य )बाबासाहेब नाईकवाडी, विलासराव वर्षे (संचालक, संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया, संगमनेर), अनिलराव देशमुख (मा. सभापती, मार्केटयार्ड कमेटी, संगमनेर), रमेशराव जगताप (व्हा. चेअरमन, बुवासाहेब नवले पतसंस्था, अकोले) सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब नवाळे यांसह आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
अॅड. खर्डे पाटील म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील विष्णू व अंजनाबाई या अतिशय कष्टाळू, व सुसंस्कृत दांपत्याच्या पोटी जन्म घेतला. आपले वडील मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागात सेवेला असल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक पर्यंतचे शिक्षण चिकणी, मन्हळ (ता. सिन्नर) व मुलुंड (मुंबई) या ठिकाणी झाले. उच्च शिक्षण संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे घेतले. वी. एड. हे व्यावसायिक शिक्षण परेल (मुंबई) येथून पूर्ण केले.
रयत शिक्षण संस्थेत आपल्या सेवेला न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव (ता. कोपरगाव) या शाखेत सेवा करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करतांना तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी वाघमारे सरांनी अगदी तन मन धनाने काम केले. इंग्रजी विषयाचे अध्यापन करतांना अगदी प्रामाणिक राहून मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे मुद्दामहून लक्ष दिले. यावेळी त्यांना कर्मवीर पारितोषिक पुरस्कार मिळाला. हि बाब अत्यंत अभिनंदनीय ठरली.
शिक्षक ते प्राचार्य म्हणून काम करतांना संस्थानिष्ठ आणि शाखानिष्ठ राहून अतिशय प्रामाणिक सेवा केली. हा सर्व सेवेचा कार्यभार सांभाळत असतांना कौटुंबिक प्रपंचात अतिशय मोलाची साथ लाभली आणि आता रयत शिक्षण संस्थेमधून सुमारे ३४ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले. वाघमारे सरांचे कार्य नेहमी उल्लेखनीय व अविस्मरणीय राहतील, यात मात्र शंका नाही, असे अॅड. खर्डे पाटील म्हणाले.