20.6 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

सुज्ञ जनता काँग्रेसच्या विचारधारेसोबत राहिल – आ. कानडे 

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर तालुका व राहुरी तालुक्यातील 32 गावात आपण कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली तसेच काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. मतदार संघातील जनता सुज्ञ असून ती आगामी काळातही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेबरोबर राहिल, असा विश्वास आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केला.

काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच मतदारांशी संवाद दौऱ्यात मुठेवडगाव, भामाठाण, कमालपूर, घुमनदेव येथे झालेल्या बैठकीत आ. कानडे बोलत होते.

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक, सतीश बोर्डे, सचिन जगताप या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते.

आ. कानडे म्हणाले की, तालुक्यातील जनतेने सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून दिले त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण जनतेची कामे केली यापुढेही करत राहणार आहे. आपल्या कार्यकाळात श्रीरामपूरला जोडणारे सर्व रस्ते चौपदरीकरण करून डांबरीकरण केले नेवासा बावळेश्वर रस्त्यासाठी 167 कोटीचा निधी आणला शेती पाणी व विजेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.

श्रीक्षेत्र गोदाधाम साराला बेट या क्षेत्राच्या सर्व बाजूने येणारे रस्ते डांबरीकरण केले काही रस्त्यांचा दर्जा उन्नत करून त्याला कायमस्वरूपी निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला. मुठेवडगाव येथील तुळशीराम महाराज देवस्थानला क वर्ग दर्जा प्राप्त करून दिल्याने या देवस्थानच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी डॉ. नितीन आसने, बाळासाहेब हुरुळे, धनंजय आसने, संजय खताळ, रवींद्र आसने, प्रमोद दांगट, डॉ. आकाश आसने, केशव आसने, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, माजी सरपंच भाऊसाहेब मुठे, बाबासाहेब भोंडगे, शिवाजी पवार, जालिंदर मुठे, रंजन चौधरी, सुभाष मुठे, तुकाराम मुठे, सोपान मुठे, रघुनाथ मुठे, भामाठानचे सरपंच दिनकर बनसोडे, हरिभाऊ बनसोडे, दिलीप नजन, संदीप बनसोडे, ताहेर शेख, जालिंदर बनसोडे, रवी मुरकुटे, बाळासाहेब दवंगे, किसनराव मुरकुटे, बाबासाहेब पटारे, संजय घोडे, सचिन गाडेकर, रवींद्र शिंदे, प्रवीण दवंगे, अक्षय कांगुणे, विकास गोरे, अमोल दवंगे आदिमसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!