लोणी( प्रतिनिधी):-लोणी येथे सिद्धार्थ युवक मंडळ व सर्व ग्रामस्थ लोणी बुद्रुक यांचे वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ९१ वी जयंती महाराष्ट्र राज्याचे सन्मा.महसूल, पशू संवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात लोणी गावचे भूषण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सन्मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींची नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्थापना करण्यात आली तसेच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मंडळाच्या वतीने भोजन दान कऱण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव विखे पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन चांगदेव मुरलीधर विखे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन सखाहारी म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब साबळे, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अनिल नानासाहेब विखे, काशिनाथ विठ्ठल विखे लोणी गावचे सरपंच, उपसरपंच,विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ युवक मंडळाचे कार्यकर्ते दिनेश ब्राह्मणे, सिद्धार्थ साबळे, संजय अंडागळे, नितीन साबळे, किरण साबळे,शैलेश साबळे, योगेश ब्राम्हणे, अमोल तपासे, प्रतिक तपासे, रवींद्र ब्राम्हणे, प्रमोद साबळे,बबन ब्राम्हणे, प्रवीण साबळे, विजय साबळे राहुल ब्राम्हणे, आशुतोष तपासे,सोमनाथ साबळे, गणेश गायकवाड, संकेत साबळे यांनी सहभाग घेतला.