3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

जरांगे पाटलांची विधानसभा २८८ जागा लढवण्याची घोषणा   उमेदवारी मिळवण्याकरता अटी, नियम आणि शर्ती 

छत्रपती संभाजीनगर (जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाचे बांधवांना आरक्षण मिळावे याकरिता जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी या गावांमधून मराठा समाजाच्या बांधवांना आरक्षण मिळावे याकरिता प्रयत्नशील असलेले जरांगे यांनी अनेक आंदोलने केली परंतु राज्य सरकारकडून कुठलाही ठोस असे पाऊल उचलली नाही.

 त्यामुळे जरांगे पाटील यांनी आज विधानसभा च्या २८८ जागेवर मराठा समाजाचे उमेदवार   उभे करण्याचे त्याचबरोबर इतर समाजातील उमेदवारांना उभे करण्याचा निश्चय केला आहे. फक्त मराठा समाज नव्हे तर इतर समाजांनाही आपल्या आंदोलनात सामावून घेण्याचा प्रयत्न जरांगे यांच्याकडून केला जात आहे.मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर आजवर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली . आता दोन दिवसांनी जरांगे यांनी त्यांची निवडणूक रणनीती आणखी पुढं नेली आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप कसं करणार याबाबतच्या सर्व अटी जरांगे यांनी जाहीर केल्या आहेत.

 

इच्छूक उमेदवाराला खालील अटी शर्ती व नियम 

– जरांगेंच्या पाठींब्यावर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना मतदारसंघातील जातीनिहाय मतदार संख्या सादर करावी लागेल

– इच्छुकांना स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल. 

– सात ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. 

– अर्जाच्या छाननीसाठी ११ किंवा २१ सदस्यांची कोअर समिती स्थापन केली जाणार आहे. 

– ती समिती अर्ज छाननी करून जरांगे-पाटील यांना माहिती देईल

– समितीनं दिलेल्या माहितीच्या आधारे जरांगे – पाटील उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील

उमेदवारांसाठी कोणत्या अटी?

– विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे.

– उमेदवार निर्व्यसनी तसंच चळवळीत सक्रिय हवा.

– जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती आवश्यक

– तालुक्याच्या प्रश्नांची जाण हवी

– मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असणे आवश्यक

– मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार, याचीही माहिती घेतली जाणार आहे.

या आंदोलनामध्ये मराठा समाजाबरोबर इतर समाजही सामावून घेण्याचा प्रयत्न जरांगे कशाप्रकारे करतात हे पाहणे गरजेचे आहे. त्यांचा हा निर्णय योग्य आहे की नाही हा येणारा काळच ठरवेल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!