11.9 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

शिवाजी कर्डिलेंसाठी मी राहुरीच तळ ठोकणार: डॉ. सुजय विखे पाटील

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा) :- अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये माझ्या विजयासाठी शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हेच उमेदवार असतील. त्यांच्या विजयासाठी मी राहुरीमध्ये तळ ठोकणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

डॉ. विखे पाटील यांनी राहुरी व संगमनेर विधानसभा निवडणूकीबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारणात धुरळा उडविला आहे. राहुरी व संगमनेरमधील राजकारण तापले असून मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे. नगर जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूकीबाबत जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी मतदारसंघाचा आढावा घेत आहे. अवघ्या काही महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेेपल्या आहेत. त्यातच डॉ. विखे पाटील यांनी विधानसभा लढविण्याबाबत वक्तव्य केले. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. या राहुरी मतदारसंघातून डॉ. विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील असा अंदाज बांधला जात होता.

तसेच त्यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यावरुन या चर्चाना अधिक बळ मिळाले. परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे राहुरी मतदारसंघात कर्डिले हेेच लढणार असल्याचे माजी खासदार विखे पाटील यांनी सांगितले.

विखेंचा मोर्चा संगमनेरकडे

डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर किंवा राहुरीमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले. विखे पाटलांच्या वक्तव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. संगमनेरमध्ये अनेक लोकांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे तेथील पदाधिकारी, नागरिकांकडून संगमनेरमध्ये विखे पाटील यांनी उमेदवारी करावी अशी मागणी आहे. डॉ. विखे पाटील हे संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!