शिरसगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील इंदिरानगर परिसरातील तुळजाभवानी मंदिरामध्ये रात्री साडेतीनच्या सुमारास अज्ञात दोन इसमाने मेन गेटवरून प्रवेश करत मंदिराच्या पाठीमागील बाजूने असलेल्या खिडकीतून आत मध्ये प्रवेश केला तसेच देवीचे दर्शन घेऊन सदर चोरट्याने ऐवज लुटला सकाळी नित्य पूजनासाठी सहा वाजता पुरोहित श्री कुलकर्णी पूजा विधीसाठी आले असताना त्यांनी मंदिरात प्रवेश करतास काही नाणे खाली अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले.
यावेळी पुरोहित कुलकर्णी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत श्री मैड यांना माहिती दिली तसेच परिसरातील भाविक नागरिकांना माहिती दिली यावरून मंदिर व्यवस्थापन समिती भाविक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी माहिती कळविली.
यावरून पोलीस उप अधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी पोलीस पथकासह भेट दिली तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंखे पोलीस हवालदार संतोष परदेशी श्री औटी किरण टेकाळे राहुल नरवडे गौतम लगड रमिज आत्तार प्रविण कांबळे आदिनी भेट देऊन पाहणी केली तसेच अहमदनगर येथील डॉग स्कॉड पाचारण करण्याची माहिती पोलिस उपअधिक्षक बसवराज शिवपुजे यांनी दिली यावेळी मंदिर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्थानिक नागरिक यांनी पोलीस प्रशासनास यापूर्वीही या मंदिरात धाडसी चोरी झाल्याची माहिती दिली.
तसेच सदर मंदिरामध्ये दुसऱ्यांदा चोरी झाली असल्याची माहिती दिली माता तुळजाभवानी मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा निमित्त मोठा उत्सव अन्नदान करण्यात येते नवरात्री उत्सवात श्रीरामपूर तसेच पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात मंदिराचे सभागृहाचे कामकाज सुरू असून परिसरात सुशोभीकरण तसेच विकास कामे सुरू आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत