23.1 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

निष्क्रीय लोकप्रतिनिधींमुळे मतदार संघातील रस्त्याचे वाटोळे -हेमंत ओगले  शेतकरी युवक संवाद यात्रेत नागरीकांनी मांडल्या व्यथा

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या पहिल्या दिवसापासुन कालच्या पाचव्या दिवशीही ग्रामीण भागात शेतकरी – युवक संवाद यात्रा पोहचताच नागरीकांनी रस्त्याच्या व्यथा मांडल्या.

निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे रस्त्याची निकृष्ट कामे झाली. संततधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून खड्यांना जलाशयाचे स्वरूप आले आहे. एकुणच या सर्व गोष्टींना वाढती कमीशनखोरी कारणीभुत असल्याचे मत नागरीकांमधुन व्यक्त झाले आहे.

दरम्यान कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी शेतकरी युवक संवाद यात्रेनिमित्त आवाज तुमचा संपर्क आमचा हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी शेतकरी युवक संवाद यात्रा सुरू केलेली आहे. समस्या जाणून घेऊन आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तसेच करण ससाणे आणि हेमंत ओगले यांच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे शेतकरी व युवकांशी संवाद साधताना करण ससाणे आणि हेमंत ओगले यांनी आश्वासन दिले.

आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी भरघोस निधी दिला त्यांच्यानंतरच्या काळात मात्र गावागावात विकास पहायला मिळाला नाही. अनेक गावात मंजुर कामे होत नाही. कामांना दर्जा नाही. भविष्यात विकासकामांना वेग देण्यासाठी हेमंत ओगले हेच योग्य असल्याची ग्वाही करण ससाणे यांनी दिली. भविष्यात आमच्या पाठीशी उभे राहून श्रीरामपूर विधानसभा स्व. जयंतराव ससाणे यांचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!