नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा):- सत्तेच्या माध्यमातून आपण नेहमीच राजकारणातून समाजकारणाचा वसा घेवून विकास कामाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच तालुक्यातील खेड्या – पाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष दिलेले असून प्रत्येक गांवात दोन गट असले तरी सर्वांना आपण बरोबर घेत सामान वागणूक देवून कार्यकर्त्यांना मोठी ताकद देण्याचे काम केलेले आहे निवडणूका येतात आणि जातात माञ माझी नेहमीच जनतेशी सौजन्यांची वागणूक राहीलेली आहे त्यामुळे तालुक्याचा पुन्हा एकदा विकास पुन्हा साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून होणाऱ्या निवडणुकीत एकजूटीने काम करण्याचे आवाहन राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांनी मुकिंदपूर येथे झालेल्या घोंगडी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.
मुकिंदपूर येथील माजी उपसरपंच प्रकाश निपुंगे यांच्या वस्तीवर कार्यकर्त्यांची बैठक सोमवार (दि.५) रोजी सकाळी १० वाजता सपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना ते बोलत होते यावेळी माजी सरंपच प्रकाश निपुंगे,माजी उपसरपंच अशोकराव उपळकर,पिचडगांवचे सरपंच पोपट हजारे,मुळा कारखान्याचे संचालक सोपान पंडीत,भाऊसाहेब निपुंगे,बजरंग निमसे,नितीन निपुंगे,माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे,प्रा.अविनाश साळवे,प्रविण साळवे, भाऊसाहेब निपुंगे,माऊली देवकाते,दिगंबर निपुंगे,रमेश सावंत,पी. आर.जाधव, नारायण लष्करे,भगवानराव शेजूळ, उत्तम इंगळे,बाबा साळवे,कैलास लष्करे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार गडाख यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळपणाने संवाद साधला यावेळी कार्यकर्त्यांनी आमचे गांवात दोन गट असले तरी तुमच्यासाठी आम्ही एकञिकपणे काम करणार असल्याचे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार गडाख यांना दिले व गांवच्यावतीने आमदार गडाख यांचा सत्कार केला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
ग्रामपातळीवर आमचे गांवात दोन गट असले तरी तुमच्यासाठी आम्ही सदैव एकञितपणे काम करणार असल्याचे आश्वासन यावेळी झालेल्या घोंगडी बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार गडाख यांना दिले.