कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-नवउद्योजकांनी व्यवसायातील संधी शोधुन स्वतः बरोबरच परिसराची प्रगती करावी, युवकांनी सामाजिक बदल लक्षात घेऊन काळासोबत पावले टाकल्यास राष्ट्र अधिक बलशाली होईल यासाठी प्रगतीच्या नवीन संधीचे सोने करावे.जो धाडस करतो तो आपल्या कार्याने इतिहास घडवून उज्वल भविष्याची वाट देखील रेखाटतो असे प्रतिपादन कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगांव सहकारी औद्योगिक वसाहतीत उद्योजक सुहास व संदिप सदाफळ यांनी एस पी पी फार्मा या नविन युनिटचा शुभारंभ सोमवारी महंत गोवर्धनगिरी महाराज व विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारताच्या विकासात तरूण उद्योजकांना स्टार्टअप सारखे उपक्रम सुरू करण्यासाठी संधी आहे. उद्योजकांनी व्यवसायाच्या संधी नेमकेपणांने हेरून इतर सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवयाय कसा निर्माण होईल हे पहावे. सुहास व संदिप सदाफळ यांनी प्राप्त केलेल्या शिक्षण कौशल्यातुन एक पाउल पुढे टाकत कोपरगांव औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने फार्मा व्यवसाय सुरू केला हि बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. संशोधन करण्यासाठी पाऊल टाकले आहे. सी डी एम ओ आणि सी आर ओ या प्रकारचे काम केले जाणार आहे.त्यामुळे इतर औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना येणाऱ्या अडचणीत मदतीचा हात देणारे केंद्र ठरणार आहे.
याप्रसंगी डॉ.राजेंद्र पिपाडा, औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर, संचालक सर्वश्री. पराग संधान, अभिजित राहतेकर, पंडीत भारूड, तसेच कारखानदार शेळके सर, रविंद्र शिंदे, मंगेश सरोदे, विश्वनाथ भंडारे, कुलदीप देशमुख, महेश खामकर, चाचा चौधरी, निलेश वाके, संघवी आदिसह सदाफळ कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते.