spot_img
spot_img

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थीची कंपनीमध्ये निवड

लोणी दि.२ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. अमोल खडके आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. सुदाम वर्पे यांनी दिली.
 महाविद्यालयांचे दीपक कोकणे विक्री अधिकारी (अम्बिशन फर्टिलाइजर प्रायव्हेट लिमिटेड, बीड), काशीद हर्षदा कृषि मार्गदर्शक (भारत आग्री प्रायव्हेट लिमिटेड, पुणे ) आकाश जाधव प्रकल्प संचालक (यूनाइटेड फॉस्फोरस प्रायव्हेट लिमिटेड, श्रीगोंदा ) आणि स्वप्नील शिंदे तंञ अधिकारी (वाॅटरशेड ऑर्गनायझेशन, संगमनेर ) या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झालेली आहे.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी कृषी महाविद्यालय, लोणी विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम, शेतकरी मेळावे इ. उपक्रमाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांच्याया यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्याक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!