spot_img
spot_img

मुकींदपूर येथील ग्रामस्थांचं प्रवरासंगम येथे होणार जलसमाधी आंदोलन स्थगित

__
नेवासा फाटा( प्रतिनिधी): –नेवासा तालुक्यातील मुकिंदपुर येथील गट नं 76 मधील शासन आदेश 4 हेक्टर क्षेत्र गावठाण मध्ये मुकिंदपुर ग्रामपंचायत ला वर्ग करून त्यावरील 1982 पासून राहणारे लोकांची अतिक्रमण नियमित करण्याचे मागणी मान्य न झाल्यास मुकिंदपूर् येथील ग्रामस्थ दिनाक 1 मे 2023 रोजी जलसमाधी आंदोलन प्रवरसंगंम येथे गोदावरी नदीवर करणार होते .
परंतु नामदार महसूल मंत्री व अहमदनगर जिल्हा चे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन आंदोलनकर्ते मल्हारराव शिंदे, राजेंद्र साळवे, बंडू अरले ,आनंद साळवे, नंदू वाकडे, संतोष साळवे, अमोल साळवे, संदीप सोनावणे, संदीप पवार यांनी नेवासा तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरक्षक शिवाजीराव डोईफोडे यांची समक्ष भेटून नेवासा फाटा येथे अहिल्यादेवी चौकात सुरू झालेले आंदोलन थांबवण्यात आले. 
या वेळी भाजपाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष उत्तर विभाग अशोकराव कोळेकर यांनी आंदोलन कर्त्याना मार्गदर्शन केले तसेच समजावून सांगितले. व तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना आंदोलनाची दखल घेण्यास सांगितले व शासन दरबारी आंदोलनकर्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करत आहेत व या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी मुकिंदपुर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!