3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

आ थोरात यांच्या मागणीवरून निळवंडेच्या कालव्यातून पाणी सुटले शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):–निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडाव अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार आज कालव्यांमधून पाणी सुटल्याने जिरायत भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले .आमदार थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून कालव्यांची कामे मार्गी लावली. हे धरण आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून झाल्याने त्यांना शेतकऱ्यांनी जलनायक म्हणून गौरविले.

मागील आठवड्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण भरले. मात्र संगमनेरसह उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला. पावसाळ्यातही अनेक ठिकाणी पाणीटंचाई आहे.

तळेगाव भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते असलेले आमदार थोरात यांनी जिरायत भागाला दिलासा देण्याकरता तातडीने दोनही कालव्यांमधून पाणी सोडावे अशी मागणी केली. याचबरोबर सर्व पाझर तलाव, के टीवेअर व सर्व बांधणारे भरून द्यावे ही मागणी शासनाकडे केली आहे .

आमदार थोरात हे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी सदस्य असून सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचा मोठा आदर होतो. त्याचप्रमाणे निळवंडे धरण व कालव्यांचे ते निर्माते असल्याने सरकारने आमदार थोरात यांच्या सूचनेवरून दोनही कालव्यांना पाणी सोडले आहे

या दोन्ही कालव्यातून पाणी सुटल्याने जिरायत भागातील व लाभ क्षेत्रातील 182 गावांमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!