संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):–मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षणातील मानबिंदू असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीए विभागातील 120 विद्यार्थ्यांपैकी 110 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यू मधून आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळाली असून प्रवेश प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेल्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी एम लोंढे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ लोंढे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी एमबीएने गुणवत्तेमुळे विविध मानांकने मिळवली आहेत. याचबरोबर आत्तापर्यंत २४११ विद्यार्थ्यांनी एमबीए ही पदवी पुणे विद्यापीठातून संपादन केली असून यातील अनेकांना वरिष्ठ पातळीवर नोकरी मिळाली आहे.
विविध कंपन्यांशी असलेल्या समन्वयामुळे अनेक कंपन्यांनी महाविद्यालयात येऊन कॅम्पस इंटरव्ह्यू घेतल्या आहेत .यामधून 120 विद्यार्थ्यांपैकी 110 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे .अमृतवाहिनी एमबीए मध्ये पुणे विद्यापीठांतर्गत पीएचडी संशोधन केंद्र ही कार्यरत असून 39 विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहे. तर महाविद्यालयांमध्ये आठ प्राध्यापक पीएचडी धारक आहेत. निसर्ग संपन्न वातावरण, स्वतंत्र इमारत, ग्रंथालय ,क्रीडांगण, प्लेसमेंट सुविधा, संगणक कक्ष, होस्टेल मेस सुविधा, ग्रीन कॅम्पस अशा विविध सुविधांमुळे बेस्ट इमर्जिंग कॉलेज हा महाराष्ट्र पुरस्कारही या महाविद्यालयाला मिळालेला आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस ,विप्रो ,विवो, टाटा स्टील, सिग्मा ,अशोका अशा विविध कंपन्यांमधून या विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे .
या सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ.नितीन भांड यांचे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शक लाभले
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात ,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा विवेक धुमाळ,डॉ.जे.बी.गुरव, डॉ. बी. एम. लोंढे, आदींनी अभिनंदन केले आहे..