spot_img
spot_img

राहाता बाजार समिती मध्ये १८जागेवर विखे गटाचा एकतर्फी विजय

राहाता( प्रतिनिधी):- राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जनसेवा मंडळाने तीन बिनविरोध जागांसह एकूण सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवित राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

विजयी जनसेवा मंडळाने माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाचा मोठा पराभव केला मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न झाली मतमोजणी संपन्न झाल्यानंतर मतमोजणी स्थळी नामदार विखे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.

राहाता बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत विखे यांचे वर्चस्व असल्याने या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाच्या विजय निश्चित मानला जात होता परंतु माजी महसूल मंत्री थोरात यांनी प्रथमच राहाता बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी परिवर्तन मंडळाचे उमेदवार उभे करून एक हाती सत्तेला विरोध निर्माण केला.आज रविवारच्या सकाळी राहाता बाजार समितीच्या एकूण १८ जागांपैकी ३बिनविरोध जागा झाल्यानंतर उर्वरित १५ जागांसाठी मतदानास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळपासून मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती दुपारी १ पर्यंत सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळी ९८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला केवळ २८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याचे समजते.
 निकाल पुढील प्रमाणे-Z
 सोसायटी मतदार संघ- (सर्वसाधारण मतदार संघ) निकाल पुढील प्रमाणे- कंसात मिळालेली मते- आण्णासाहेब भाऊसाहेब कडू (649), विजय उर्फ राजेंद्र बाबुराव कातोरे (635), संतोष लक्ष्मण गोर्डे (639), दत्तात्रय विठ्ठलराव गोरे (624), ज्ञानेश्‍वर गंगाधर गोंदकर (646), ज्ञानदेव नारायण चौधरी (638), बाबासाहेब पोपटराव शिरसाठ (629) सर्व विजयी जनसेवा मंडळ. सार्थक सचिन कोते (204), बाळासाहेब किसन खर्डे (201), जगन्नाथ दादा गोरे (204), बबन लक्ष्मण नळे (200), उत्तमराव सावळेराम मते (196), विठ्ठल कचरु शेळके (201), नितीन विष्णुपंत शेळके (198) सर्व पराभुत महाविकास आघाडी.
महिला मतदार संघ– मिना भिमराज निर्मळ (630), रंजना सोन्याबापु लहारे (637), दोन्ही विजयी जनसेवा मंडळ. अनिता शरद गोर्डे (225), लता वसंत चव्हाण (220) दोन्ही पराभुत महाविकास आघाडी. इतर मागास प्रवर्ग- दिलीप विश्‍वनाथ गाडेकर (655) विजयी जनसेवा. अण्णासाहेब बजाबा वाघे (225) पराभुत महाविकास आघाडी.
विमुक्त जाती भटक्या/ विशेष मागास प्रवर्ग– राजेंद्र भागवत धुमसे (640) विजयी जनसेवा मंडळ. सुनिल मुरलीधर थोरात (242) पराभुत महाविकास आघाडी.
ग्रामपंचायत मतदार संघ- सर्वसाधारण मतदार संघ- जालिंदर दगडू गाढवे (447), राहुल मच्छिंद्र धावणे (426) दोघेही विजयी जनसेवा मंडळ. विजय बबनराव चौधरी (141), शरद भाऊसाहेब भदे (133) दोघेही पराभुत महाविकास आघाडी. भास्कर दामोधर मोटकर (05) पराभुत अपक्ष.
अनुसुचित जाती / जमाती मतदार संघ– सुभाष तुकाराम गायकवाड (458) विजयी जनसेवा मंडळ. रमेश सिताराम बनसोडे (135) पराभुत महाविकास आघाडी.
 अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ– शांताराम सोपानराव जपे (437) विजयी जनसेवा मंडळ, श्रीकांत तान्हाजी मापारी (162) पराभुत महाविकास आघाडी.
जनसेवाचे ३ उमेद्वार माघारीच्या दिवशीच बिनविरोध झाले ते उमेेदवार असे- 
हमाल मापाडी मतदार संघ– बाबासाहेब साकु्र्रजी कांदळकर 
व्यापारी मतदार संघ – सचिन फकिरा कानकाटे, निलेश कानिफ बावके असे तीघे यापुर्वीच बिनविरोध झाले होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहायक निबंधक रावसाहेब खेडकर,पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!