लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-कौशल्य शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष केला तर या माध्यमातून आपला विकास होईल विकास साध्य करण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयातील गृहविज्ञानच्या वस्ञशास्ञ आणि परिधान विभागामार्फत राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित सौ.विखे पाटील बोलत होत्या.यावेळी कापसे फाउंडेशनचे बाळकृष्ण कापसे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,प्राचार्या डाॅ.अनुश्री खैरे,डॉ जया दबरासे, डॉ. कांचन देशमुख, प्रा. गायत्री गहिरे,प्रा. कल्याणी घोरपडे,प्रा.रुपाली नवले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आपल्या जवळ असणाऱ्या कौशल्याचा विकास करताना एकमेकींना सोबत घेऊन चाललात तर स्वतः बरोबरच राष्ट्राचा विकास होईल असे सांगितले. कापसे यांनी ही मुलींना छोटी वाटणारी ही कौशल्ये किती उपयोगाची भविष्यात ठरतात, हे समजावून सांगितले.तर सौ लीलावती सरोदे यांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त त्याचा इतिहास उलगडून दाखवला.यावेळी महविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अनुश्री खैरे विविध उपक्रमांची माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्मिता रनवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रुपाली नवले यांनी केले.