लोणी दि.३०( प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात टेककेयर मेडिकल सर्व्हिसेस प्रा. ली.या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १८४ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. सोमेश्वर मनकर यांनी या बहुराष्ट्रीय कंपनी चा कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले होते. प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी आणि इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हि संधी उपलब्ध करून दिली होती. सुमारे १८४ पदवी व पद्युत्तर मध्ये शिकत असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कॅम्पस मुलाखती मध्ये आपला सहभाग नोंदवला. टेककेयर मेडिकल सर्व्हिसेस यांचे मार्फत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधुर व एच. आर. प्रमुख सौ. गौरी कन्नूर, सौ. पूजा हे तज्ञ मुलाखतीसाठी महाविद्यालयात आले होते. श्री. मधुर यांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यलाय घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले व त्यांना मोलाचे मार्दर्शन केले. तर सौ. गौरी यांनी कंपनीच्या कामकाजाविषयी विस्तृत रित्या माहिती दिली. सुमारे ३५ विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली असून वर्षाच्या परीक्षेपूर्वीच मिळालेल्या नोकरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झाले. संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अशा कॅम्पस मुलाखतीचे आयोजन नेहमी केले जाते. महाविद्यालयात या साठी स्वतंत्र ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. विदयार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यामध्ये प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी हे अग्रभागी आहे. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. सोमेश्वर मनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजीअध्यक्षासौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव मा. श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डाॅ. मनोज परजणे यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय भवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



