spot_img
spot_img

मी अधिकारी होणार..तू मला आता शोभणार नाहीस !मला दुसरे लग्न करायचे आहे पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या गळनिंब येथील घटना

कोल्हार प्रतिनिधी : आता मी अधिकारी होणार आहे त्यामुळे तू मला शोभणार नाहीस. हवं तर तुला मोलकरीण म्हणून ठेवेल. मला दुसरे लग्न करायचे आहे. असे बोलत आपल्या पत्नीस टॉर्चर केल्याने विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लोणी पोलिसात दाखल झाला आहे. सदर घटना श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली.
संदीप सखाराम बाचकर रा. गळनिंब असे आरोपीचे नांव आहे. याबाबत मयत मुलीचा भाऊ दीपक भानुदास धुळगंड यांनी फिर्याद दिली आहे.श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहिता भाग्यश्री संदीप बाचकर वय २८ या विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. सदर महिला घरातून बेपत्ता झाली होती. सासरच्या व परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला. मात्र अखेर कुरणपूर शिवारातील बचछलाबाई देठे यांच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळला. 
याबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यात मी आता अधिकारी होणार असल्याने तू मला शोभनार नाहीस. मला दुसरे लग्न करायचे आहे. हवे तर तुला मोलकरीण म्हणून ठेवेल. आशा प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत लोणी पोलीसात गुन्हा रजी.नंबर २२०/२०२३ भादवी कलम ३०६, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय युवराज शिंदे करीत आहेत.
————-
सदर आरोपी हा शिक्षक असल्याचे समोर येते तसेच गत एक वर्षांपासून तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. घटनेच्या दिवशी आरोपी पती व मयत पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. आरोपी हा टॉर्चर करीत असे व त्याचा स्वभावही त्याच पठडीतील असल्याची चर्चा ग्रामस्थांकडून समजते.
—————-
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!