8.8 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

महायुती सरकार घोषणा करणारे नव्हे तर अंमलबजावणी करणारे- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-महायुती सरकार घोषणा करणारे नव्हे तर अंमलबजावणी करणारे आहे. आम्ही जनतेसाठी काम करतो.पण ज्यांना काहीच करता आले नाही ते फक्त विरोध करतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना वेळीच ओळखण्याचा सल्ला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महीला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.मंत्री राधाकृष्ण विखे या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीने सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले,विनायक देशमुख,भाजपाच्या शहर अध्यक्षा प्रिया जानवे यांच्यासह महीला उपस्थित होत्या.महीला बचत गटांना अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ आता ओळखा.महायुती सरकारने सर्व बहीणीच्या अर्थिक उत्कर्षा करीता योजना सुरू आहे.केवळ घोषणा नाही तर अंमलबजावणी झाल्याने खात्यात पैसे जमा होत असल्याचे सांगून आधार कार्ड लिंक झाल्यानंतर उर्वरीत खात्यात पैसे जमा होतील असे विखे पाटील म्हणाले.

राज्य सरकारने महीलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असून,बस भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत विद्यार्थ्यांनीना मोफत शिक्षण तिर्थदर्शन योजना आणि बचत गटाच्या माध्यमातून अनुदान देण्याचे काम सुरू आहे.जनतेच्या मनातील सरकार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

जिल्हयात अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे सात लाख महीलांचे अर्ज मंजूर होवू शकले.ही योजना पुढेही चालू राहाणार असल्याने योजनेचे हप्ते खात्यात जमा होतील असा विश्वास त्यांनी उपस्थित महीलांना दिला.सर्व महीलांनी मंत्री विखे पाटील यांंना राखी बांधून योजनेचा आंनंद साजरा केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!