लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने विविध शाळा,महाविद्यालयामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती सप्ताह निमीत्ताने क्रीडा स्पर्धा, निंबध, रांगोळी अशा विविध स्पर्धा, वृक्षारोपण यासह सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात आले.
पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने श्री क्षेत्र श्री निझर्नेश्वर डोंगरावर येथे वृक्षारोपण आणि बीजारोपण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये विविध वृक्षांचा रोपण करताना ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे रोपण जास्त प्रमाणात करण्यात आलं यामुळे खऱ्या अर्थानं पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सामाजिक बांधिलकीतून अभिवादन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे यांनी दिली.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी यांनी सहकार, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सर्वांनाच बरोबर घेण्याचं काम केलं आहे त्यांची शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांच्या विचारातून जडणघडणीतून विद्यार्थी हा तयार व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामध्ये विविध क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमातून हा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताह अंतर्गत प्रवरेच्या सर्व शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा रांगोळी, निबंध , वकृत्व ,क्रिडा स्पर्धा त्याचबरोबर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबवले जातात. पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून निझर्नेश्वर ठिकाणी असलेल्या डोंगरावरती वृक्षारोपण करण्यात आलं आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे… हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी दिला आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक सर्वश्री प्रा. व्ही.व्ही. कडलग, प्रा जी. के गायकर,प्रा. ए. ए. भुजाडी.,प्रा एल. बी. गारुळे, प्रा. के.जी. कडू, प्रा. एल. डी. भागवत, प्रा आर. एल. चांडे,प्रा. पी.डी वाघ, बी.एम.घोलप,प्रा एस. के. सोनवणे,प्रा. के. एन.भोसले आदीसह विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांत्रिक आणि अतांत्रिक अशा सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमातून पद्मश्रींचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सांगत असताना पद्मश्रींचे विचार जपण्याचं काम युवा पिढीने करावा हाच संदेश या सप्ताहाच्या माध्यमातून देतानाच विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. असे संस्थेच्या संचालिका सौ लीलावती सरोदे,समन्वयक प्रा. नंदकुमार दळे यांनी सांगितले.