लोणी दि.२८( प्रतिनिधी):
शिक्षणांसोबत नोकरी हा हेतू प्रवरेचा कायम असतो. यामुळे महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस मुलाखती आयोजित करून प्रवरा ग्रामीण अभियांञिकी महाविद्यालय लोणी येथील शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या दहा विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांत १२.४८ लाखांपर्यंतच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाणे यांनी दिली.
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या नितीन दिवे,कांचन सोनवणे, अभिषेक गाडेकर, स्वामिनी दिघे, किरण काळे, उद्धव बोरावके, सिद्धेश एखंडे, संकेत गुंजाळ, प्रेम जगताप व कृष्णा सांबळे या दहा विद्यार्थ्यांची जाबील सर्किट इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी २०२३ या शैक्षणिक वर्षात सध्या शेवटच्या वर्षांत असून काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये निवडण्यात आले आहे.जाबील इंडिया प्रा. लि. पुणे या कंपनीतर्फे श्री तुकाराम जाधव, श्री. प्रदीप नागमोडे आणि सोबत आलेल्या टीमने महाविद्यालयाच्या विद्यार्थांची निवड केली. श्री प्रदिप नागमोडे हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी महाविद्यायातर्फे होत असलेले नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह व उत्कृष्ट पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयक डॉ. आण्णासाहेब वराडे यांनी सांगितले की, पुणे येथील जाबिल इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय मुलाखती घेतल्या. कंपनीने परिसर मुलाखती घेण्यासाठी प्रवरा रुरल इंजिनिरिंग कॉलेजला पसंती दिली आहे. प्लेसमेंट आयोजित करण्यासाठी प्रवरा तंत्रनिकेतनचे प्रा. श्री राजेंद्र निंबाळकर , प्रवरा इंजिनीरिंगचे डॉ. पंकज चित्ते, प्रा. राहुल कडू यांनी प्रयत्न केले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पा., माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पा., सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ.मनोज परजणे ,विभाग प्रमुख डॉ. संजय कुरकुटे, प्रा. सीमा लव्हाटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाचा अभिमान…
शिक्षणासोबतचं आत्मविश्वास वाढविण्यासाठी वेळोवेळी विविध चर्चासञातुन माहीती,व्यक्तीमत्व विकास,मुलाखत तंञ मिळाली.मी दाढ बुद्रुक येथील असून माझे वडील शेतकरी आहे. सर्व शिक्षकांनी छान मार्गदर्शन केले. माझ्यासह दहा जणांची नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाल्याने मला महाविद्यालयाचा अभिमान वाटत आहेत.
अभिषेक गाडेकर, विद्यार्थी