spot_img
spot_img

कोल्हार येथील आरोपीस ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहाता तालुक्यातील कोल्हार येथील योगेश ज्ञानेश्वर चव्हाण यास कोपरगाव येथील सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि आरोपी हा कोल्हार येथील कुंकुलोळ कॉम्प्लेक्स कंपाऊंडच्या  लोखंडी अँगलच्या चोरीचा प्रयत्न करत असताना त्यास हटकल्याचा राग आल्याने हातातील रॉडने शिवकुमार लोणकर व त्यांचा मुलगा विशाल यांना मारहाण केली. त्यात त्यांना जबर दुखापत झाली होती. त्यानुसार आरोपीवर लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. कलम ३९७ नुसार दाखल गुन्ह्यात ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.

या गुन्ह्याचा तपास लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, ए.एस.आय.माळी, हेड कॉ. दहिफळे यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केला असून न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने वकील पी.व्ही. बुलबुले, बी.डी.पानगव्हाणे यांनी काम बघितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!