लोणी दि.२७ प्रतिनिधी:-शिर्डी मतदार संघ हा नेहमीचं विकासाच्या मागे उभा असतो. शेजारी हे त्रास देत असले तरी तुमचा त्रास तुम्हालाच होणार आहे. हा मतदार संघ नेहमीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठिशी उभा आहे. आज पर्यत विविध पदाच्या माध्यमातून सर्वाना न्याय दिला असून आमच्या मतदार संघाप मतभेद वाढविण्याचे काम करू नका असा इशारा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी देतांनाच राहाता बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपा शिवसेना प्रणीत जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडककीच्या प्रचार बैठकीमध्ये खा. डॉ. सुजय विखे पाटील हे दाढ बुद्रुक येथे मतदारांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रणीत जनसेवा मंडळाचे सर्व उमेदवार डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक अँड. भानुदास तांबे, देवीचंद तांबे, पंचायत समितीच्या माजी सभापती नंदाताई तांबे,दाढच्या सरपंच सौ. पुनम तांबे, प्रल्हाद बनसोडे, आदीसह दुर्गापूर, हसनापूर, चंद्रापूर, दाढ, हनमंतगांव, पाथरे येथील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.सुजय विखे पाटील म्हणाले, विरोधाकांनी ही निवडणूक आपणांवर आदली आहे. या मतदार संघात मतभेद निर्माण करण्याचे काम केले आहे. हा मतदार संघ नेहमीचं विखे पाटील परिवारासोबत राहीला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार अतिशय चांगले काम करत आहे. महसूल मंत्री म्हणून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाविन्य पुर्ण काम राज्यात सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.त्यांचा जास्त ञास सध्या शेजारी होत आहे असे माजी मंञी बाळासाहेब थोरात यांचे नांव न घेता सांगत विरोधाकांना त्याची जागा या निमित्ताने दाखून देण्याची ही संधी असल्याचे सांगून महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत आहे. येणा-या काळात मतदार संघातील गांवामध्ये बैठका घेऊन गावाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. निवडकीतून आपली एकता दाखवून द्या जिल्हात बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळणार आहे असे सांगुन किती ही डोकं लावा काहीच फरक पडणार नाही पण आम्ही डोकं लावलं की काय होत हे निकालानतंर कळले असे सांगितले.
प्रारंभी प्रवरा बॅकेचे संचालक प्रमोद रहाणे यांनी उमेदवारांचा परिचय आणि मतदान प्रक्रिया समजून सांगितली.