लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- यश अपयश यांची चिंता न करता खेळातून आनंद घ्या. शिक्षणा सोबतचं खेळामधुनही चांगले करीअर घडू शकते हे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दाखवून दिले. शिवाय आरोग्यासाठी ही खेळाचे महत्व मोठं आहे. अभ्यास सोबतचं खेळास महत्व द्यावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाला.यावेळी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, विद्यापीठाचे क्रिडा अधिकारी डाॅ.विलास आवारी,डाॅ.अभिजित नलावडे,अण्णासाहेब कडू, सौ.गिताताई थेटे,कृषि संचालक डाॅ.उत्तमराव कदम,प्राचार्य सर्वश्री डाॅ.विशाल केदारी,प्रा. भाऊसाहेब घोरपडे, डाॅ.अशिष शिरसागर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, व्यायाम चांगला केला तर आरोग्य चांगले चांगले राहते. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देखिल खेळास प्राधान्ये दिले आहे. कोविडनतंरच्या काळात क्रिडा स्पर्धेत सहभाग वाढ आहे. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षण देतांनाचा खेळासाठी ही भव्य मैदाने आणि प्रोत्साहन दिले आहे. यामुळे शिक्षणासोबतचं प्रवरेतून चांगले खेळाडू ही निर्माण झाल्याचे सांगितले.जय-पराजय हे होत असतात यातून पुढे जा.मिळालेल्या संधीतून पुढे जा हा संदेशही सौ.विखे पाटील यांनी खेळाडूना दिला.
यावेळी डाॅ.विलास आवारी,,डाॅ.उत्तमराव कदम यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी प्राचार्य डाॅ.विशाल केदारी यांनी प्रास्ताविकांतून महाविद्यालयांच्या उपक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुञसंचालन डाॅ.रमेश जाधव यांनी तर आभार प्रा.सिताराम वरखड यांनी मानले.