कोल्हार ( वार्ताहर ) :- श्रीरामपूर तालुक्यातील कडीत बुद्रुक येथील व हल्ली मुक्काम पुणे येथील ऊर्जा उद्योग समूहाचे ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर आण्णासाहेब संतराम वडीतके यांनी नुकतीच ” मॅनेजमेंट स्टडीज ” या विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.
मुंबई येथील कायझन मॅनेजमेंट स्कूलमधून त्यांनी ही डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यांना कायझन स्कूलचे डॉ.आकांक्षा, डॉ. बाळकृष्ण गोसावी, डॉ. संतोष प्रभाकरन, डॉ. संजीव तलाठी यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
उद्योग व्यवसायातील फायदे तोटे, उत्पादन वाढ, व्यवसाय वृद्धी, उद्योग व्यवसायासाठी आवश्यक घटकांचा सर्वांगीण अभ्यास केलेल्या ” मॅनेजमेंट स्टडीज ” या विषयावर त्यांनी प्रबंध सादर करून ‘अ ‘दर्जा प्राप्त केला.
त्यांच्या या यशाबद्दल ऊर्जा उद्योग समूहाचे चेअरमन मा.प्रकाश कुतवळ (सदस्य. दुग्धविकास सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन ) , मॅनेजिंग डायरेक्टर मा. राम कुतवळ,कडीतचे सरपंच ज्ञानेश्वर वडितके यांनी अभिनंदन केले.