श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-आपल्या मुलींनी लव जिहाद बळी पडू नये, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल तो त्याच ठिकाणी ठेचा, असे आवाहन भाजपचे आमदार निलेश राणे यांनी केले.
महंत रामगिरी महाराज काय चुकीचे बोलले हे समजत नाही. त्यांच्या बुद्धिवादी लोकांनी सांगावे की रामगिरी महाराज जे बोलले ते चुकीचे आहे. अशा वक्तव्यामुळे एवढं रान माजविण्याचे काहीच कारण नाही. हिंदुंवर बांगला देश व पाकिस्तानात एवढे अत्याचार होत असतील तर आपल्या देशात त्यांचे लाड का करायचे? या वक्तव्यामुळे रामगिरी महाराज यांना युट्यूबवर धमक्या दिल्या जात आहेत. रामगिरी महाराज यांच्या केसालाही धक्का लावला तर त्यांना जिवंत सोडणार नाही, असा इशाराही आ. नितेश राणे यांनी दिला.
सकल हिंदू समाज, राष्ट्रीय श्रीराम संघ, सकल वारकरी संप्रदाय यांच्यावतीने मंहत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगला देशात होत असलेल्या हिंदू अत्याचाराच्याविरोधात समर्थन रॅली काढण्यात आली. यावेळी झालेल्या जाहीर सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. नितेश राणे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, नवनाथ महाराज म्हस्के, कृष्णानंद महाराज, रंजाळे महाराज, गणेश महाराज आदी उपस्थित होते.
आ. नितेश राणे म्हणाले की, महंत रामगिरी महाराज काय चुकीचे बोलले हे समजत नाही. त्यांच्या बुद्धिवादी लोकांनी सांगावे की रामगिरी महाराज जे बोलले ते चुकीचे आहे. अशा वक्तव्यामुळे एवढं रान माजविण्याचे काहीच कारण नाही. हिंदुंवर बांगला देश व पाकिस्तानात एवढे अत्याचार होत असतील तर आपल्या देशात त्यांचे लाड का करायचे? या वक्तव्यामुळे रामगिरी महाराज यांना युट्यूबवर धमक्या दिल्या जात आहेत. रामगिरी महाराज यांच्या केसालाही धक्का लावला तर त्यांना निवडून निवडून मारू, असा इशाराही त्यांनी दिला. आमचा हिंदू जागृत आहे. आमच्या नादी लागू नका. सर्वधर्म समभाव मानत नाही. लव्ह जिहादच्या नादी लागू नका, आपल्या भगिनींना फसवून त्यांचे आयुष्य खराब करत असतात. अशा जिहादला आपल्यातून फेकून द्या. हिंदू धर्म म्हणून आपण स्वाभिमानाने जगले पाहिजे. रामगिरी महाराज यांचे वक्तवय मागे घेणार नाही. हिंदू धर्म म्हणून रामगिरी महाराज यांच्या मागे उभे राहावे लागणार आहे. लहान लहान मुलांचे जे धर्मांतरण केले जात आहे, कोवळ्या वयात त्याला मारण्याची धमी देत अजान, नमाज शिकविले जाते, हे किती भयाण आहे. महाराष्ट्रात ज्या वाटेवर जात आहे ते योग्य नाही. काही घटनांमध्ये जो न्याय त्यांना दिले जाते तो हिंदू धर्माला का नाही? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी नवनाथ महाराज म्हस्के यांचे भाषण झाले.
सागर बेग म्हणाले की, हिंदू धर्म जो ठिकठिकाणी विभागला गेला आहे त्याला एकत्र आणण्याची ताकद रामगिरी महाराज यांच्यात आहे. त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे त्यांच्या अंगाला हात लावण्याची कुणी हिंमत करणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे