लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- कृषि शिक्षण ही काळाची गरज आहे. रोजगार निर्मितीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा महत्त्वपूर्ण आहे. कृषी शिक्षणासोबतच कृषी संलग्नित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमार्फत आपल्या प्रात्यक्षिक प्लॉटवर नव्या तंञज्ञानातून शेती करून या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार केला तर शेती व्यवसाय हा लय भारी होऊ शकतो. हेच प्रवरा कृषी शास्त्र संस्थेने शिवार फेरीच्या माध्यमातून दाखवून दिलेआहे. क्लास रूम टू फील्ड ही संकल्पना राबवत संपन्न झालेली शिवार फेरी अनेक शेतकरी बांधवांना ही महत्त्वपूर्ण ठरली आहे.
प्रवरा शैक्षणिक संकुल हे शिक्षणाचे एक मॉडेल असावे हा प्रवरेचा कायमच ध्यास राहिला आहे.यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात तांत्रिक आणि अतांत्रिक विभागातून शिक्षण देत असताना कृषी क्षेत्रातील शिक्षणातून क्लास रूम टू फिल्ड ही संकल्पना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, प्रवरा कृृृषि शास्ञ संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी राबवत खडकाळ असे माळरान प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची सांगड घालून कृषी तंत्रज्ञान पार्क करत मल्चींग तंञज्ञान, हायड्रोपोनिक तंत्राचा वापर करून भाजीपाला उत्पादन, मर्यादित खते आणि मर्यादित खते आणि मर्यादित पाण्याचा वापर या क्षेत्रात मधुमक्षिका पालन सोबतच विद्यार्थ्यांना जमिनीच्या निवडीपासून पिकांची निवड,मशागत, लागवड पद्धत लागवडीनंतर खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, काढणी तंत्रज्ञान काढणीनंतर मार्केटिंग आदींची माहिती दिली. आणि या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पादन काढत या विद्यार्थ्यांनी आपणही चांगल्या प्रकारे शेती करू शकतो हे प्रत्यक्ष दाखवून दिले केले.
नुकत्याच झालेल्या शिवार फेरी, कृषी प्रदर्शन, महिला बचत गटाची उत्पादने, विविध विषयावरील चर्चासत्रातून शेतकरी, महिला, कृषी उद्योजक, विद्यार्थ्यांना शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. स्मार्ट आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडीओव्दारे व्हाय वेस्ट वॉटर वाय इ डब्ल्यू एस पाण्याच्या बचतीचे महत्त्व ही सांगण्यात आले. मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करत हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे सांगत प्रत्येक महाविद्यालयाने हा उपक्रम आपल्या भागात राबवून कृषी शिक्षणातून कृषी विस्तार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतांना या मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक आणि त्यांच्याशी थेट संवादही मंत्री विखे पाटील यांनी साधला. हा उपक्रम राबवण्यासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील सर्व शास्त्रज्ञ कृषी महाविद्यालयातील प्राचार्य डाॅ. विशाल केदारी, प्रा.भाऊसाहेब घोरपडे , डॉ.आशिष क्षीरसागर, डॉ.चंद्रकला सोनवणे आदींसह सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.
शेती व्यवसाय बदलतोय आणि हा बदल शेतकरी बांधवांना लवकर समजावा या दृष्टीने कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत शिक्षणासोबतच विविध ज्ञान विद्यार्थ्यांना दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या प्लॉटमध्ये वेगवेगळी उत्पादने घेतली आहेत आज या विद्यार्थ्यांनी ग्रो बॅगच्या माध्यमातून ६० किलो पर्यंत भोपळा, कारली, दोडकी, घोसाळे!काकडी यांची उत्पादने घेत यासाठी त्यांनी जैविक आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आणि सोबतच मार्केटिंग देखील केली आहे. प्रवरेतून कृषीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी उत्पादन मार्केटिंग आणि प्रक्रिया याची चालना देण्याचे काम होत आहे. विद्यार्थी प्राध्यापक यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून होत आहेत आणि हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डाॅ. उत्तमराव कदम यांनी परिसरातील शेतकरी शिक्षक आणि विद्यार्थी यांना प्रशिक्षण दिल्याने आज हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचले आहे प्रवरा शैक्षणिक संकुलातील इयत्ता अकरावी पासून पुढे शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला यापुढे कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतीचं तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न कृषी संलग्नित महाविद्यालयाचा असणार आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी सांगितले.
कृषी शिक्षणातून ग्रामीण विकास सहज शक्य आहे आणि याचसाठी प्रवरा कृषी शास्ञ संस्थेच्या माध्यमातून प्रात्यक्षिके सुरू करण्यात आली आहेत. नर्सरी, मशरूम, मधुमक्षिका पालन, जैविक सेंद्रिय उत्पादने गांडूळ खत आणि व्हर्मीवाॅश निर्मिती,दुग्धजन्य प्रदार्थ निर्मिती,भाजीपाला,फळप्रक्रिया टाकाऊ पासून टिकाऊ त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध निविष्ठा देण्याबरोबरच शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान देण्याचं काम कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. क्लास रूम टू प्लॉट ही संकल्पना प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या माध्यमातून यशस्वी होत आहे. आज संस्थेचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेञात नोकरीस आहेत नोकरी सोबत आदर्श शेतकरी आणि कृषि उद्योजक घडविण्याचे काम संस्था करत आहे. यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांची मोठी मदत होत आहे असे प्रा.डाॅ.उत्तमराव कदम यांनी सांगितले.