श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. मालवण येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून राज्य सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेलाच कलंक लावल्याचे जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर महाविकास आघाडी,श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष,स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले,
त्याप्रसंगी ससाणे बोलत होते, यावेळी आंदोलकांनी भर पावसात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मालवण मधील घटनेचा तीव्र निषेध केला. यानंतर जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने अवघ्या आठ महिन्यात पुतळा कोसळला आहे. यासंबंधी देशाच्या पंतप्रधानांना माफी मागावी लागते हे सरकारचं अपयश आहे.
यानंतर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की महायुती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचलला आहे, राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून कमिशन दया आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरू आहे. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या भाजप सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अवमान केला आहे.यानंतर शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडधे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला.
राज्याच्या इतिहासात अशी दुर्दैवी घटना यापूर्वी कधीही घडली नाही. यानंतर बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण म्हणाले की महायुती सरकार महाराष्ट्रद्रोही व शिवद्रोही असून महाराष्ट्रातील जनता सरकारच्या या गलिच्छ राजकारणास कधीही माफ करणार नाही. यानंतर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राधाकिसन बोरकर म्हणाले की या दुर्दैवी घटनेच्या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. यानंतर काँग्रेस सेवा दलाचे सरवरअली मास्टर म्हणाले की महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेला पाठीशी घालण्यासाठी विविध विधाने केली जात आहेत.यानंतर अशोक जगधने म्हणाले की महाराष्ट्रातील भ्रष्ट सरकारने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. या प्रसंगी आंदोलकांनी सदर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींना कठोर शासन करण्याची मागणी केली.
यावेळी मा.नगराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाजार समितीचे संचालक विलास दाभाडे, मा. नगरसेवक मुजफ्फर शेख, रितेश रोटे, आशिष धनवटे, मर्चंटचे संचालक निलेश नागले, प्रवीण नवले,शिवसेनेचे निखिल पवार,शहरअध्यक्ष रमेश घुले, मिथुन शेळके, सुरेश ठुबे, रितेश एडके, सुनील साबळे, सनी सानप, सुरेश कालंगडे, सुरेश माकोणे,विजय ढोकचौळे, लक्ष्मण शिंदे, गणेश गायधने, योगेश गायकवाड, अनिल लबडे, रमेश जेजुरकर, शाहेबाज पटेल,संजय गोसावी, सुरेश बनसोडे,विशाल साळवे,राजेश जोंधळे, श्रेयस रोटे, सागर दुपाटी, कल्पेश पाटणी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.