संगमनेर,दि.२३ प्रतिनिधी:- संगमनेर तालुक्याच्या नेतृत्वाकडून होत असलेल्या अन्याय आणि अडवणूकीला कंटाळून कोकणगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर थोरात गटाला धक्का बसला आहे.
कोकणगाव ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचा पालकमंत्री ना विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्ता मिळविली. यामुळे अन्य गावांमधीलही ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे संचालक भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक झाले आहेत.
कोकणगाव येथील कार्यकर्ते रमेश शिंगोटे, मच्छिंद्र पवार, घनश्याम भोसले, रामनाथ गायकवाड, विजय वामन, कैलास पवार, बाळासाहेब पवार, अनिल जोंधळे, राजेंद्र पारधी, पोपट भोसले, भास्कर भोसले, विठ्ठल जोंधळे यांनी यांनी ना.विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करुन पक्षाच्या पदाधिका-यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
याप्रसंगी डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, डॉ.सोमनाथ कानवडे, अमोल खताळ, भाजयुमोचे सचिन शिंदे, रविंद्र गाढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोकणगावचा विकास करण्याचा मानस या पदाधिका-यांनी व्यक्त केला.