23.8 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रा. तुळशीदास खटकेंना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- वॉशिंग्टन डिजिटल विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कामाची पावती म्हणून प्रा. तुळशीदास खटके यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. त्यामुळे प्रा. कटके यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रा. तुळशीदास खटके हे जवळजवळ 23 वर्षे कोचिंग क्लासेस मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट अविरतपणे काम करत आहे. महाराष्ट्रातून शंभर ते दीडशे डॉक्टर, इंजिनिअर घडविलेले आहेत व पाचवी ते दहावीपर्यंत वेगवेगळया स्कॉलरशिप, डॉ. होमी भाभा, बाल वैज्ञानिक, एम. टी. एस. सी, एन. टी. एस. सी, आर. एम. ओ, आय. एम. ओ. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इंग्लिश ऍस्ट्रॉनॉमी इत्यादी ऑलिंपियाड, NDA, IISER, NISER, IISC बेंगलोर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सविस्तर माहिती देऊन मुलांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे.

मुलांना मार्गदर्शन करणे, असे अनेक सेमिनार ऑर्गनाईज करुन व कोचिंग इंडस्ट्रीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, मोठ्या मार्केट प्लेसमध्ये जाऊन तेथील मुलांना मार्गदर्शन करणे हे मुलांना त्यांच्या ध्येयापर्यत पोहोचणे हे कार्य आजपर्यंत करत आले आहे.

23 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता व पहिला लॉकडाऊन काळात, हिमतीने बाहेर पडून कोचिंग क्लासेस सुरु करण्याची परवानगी मागितली. त्यादिवसापासुन ते आजपर्यंत अविरतपणे कोचिंग क्लासेस संचालक व खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे.

तसेच नवनवीन कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ऑफलाइन-ऑनलाइन पध्दतीमध्ये कशी डेव्हलप करायची, कोणत्या पध्दतीने रणनीती आखायची त्याब‌द्दल मार्केटिंग कशी करायला पाहिजे, गरीब विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, त्या दृष्टीकोनातून नवनवीन संकल्पना अवगत करत आज जवळजवळ 23 वर्षे काम करत आले आहे.

या कार्याची दखल घेऊन वॉशिंग्टन डिजिटल विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कामाची पावती म्हणून प्रा. तुळशीदास खटके मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!