16.2 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

गणेश उत्सवानिमित्त प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्‍यावतीने यावर्षी प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन करण्‍यात आले असून, ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच ‘सहकारातून समृद्धतेकडे’ हा विचार नव्‍या पिढीपर्यंत पोहोचविण्‍यात येणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवन प्रवास आणि सहकारातून सहकार चळवळीतून झालेले परिवर्तनाचे देखावे महोत्‍सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

महसूल मंत्री तथा संस्‍थेचे अध्‍यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून मागील अनेक वर्षांपासून राहाता तालुक्‍यातील एक गाव एक गणपती ही संकल्‍पना राबविली जात आहे. लोणी, प्रवरानगर, कोल्हार, राहाता, आश्वी येथे प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन या महोत्‍सवातून दरवर्षी करण्‍यात येते. या महोत्‍सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळू लागली. महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने विद्यार्थ्यांना अंगीकृत अशा कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्‍याने या कला व क्रिडा महोत्‍सवाला प्रतिसादही चांगला मिळत आहे.

यंदाच्‍या वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांचे लेझीम – ढोल ताशा पथक मतदार संघातील प्रत्येक गावात पोहोचणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा संदेश देण्‍यासाठी प्रवरेच्या १०६ शाळा, महाविद्यालयामध्ये पर्यावरण पूरक मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या माध्यमातून जवळपास दीड हजाराहून अधिक गणेश मुर्ती तयार करण्यात आल्या. सदर मुर्ती तयार करताना यामध्‍ये झाडांच्‍या बियांचा वापर करण्‍यात आला आहे. जेणेकरुन मुर्ती विसर्जनानंतर वृक्ष लागवडीची मोहीमही यशस्‍वी होवू शकेल याचा विचार प्राधान्‍याने केला गेला आहे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरु केलेली सहकार चळवळ आणि त्‍या माध्‍यमातून समाजातील सर्व घटकांना मिळालेली समृध्‍दता ही मध्‍यवर्ती संकल्‍पना यंदाच्‍या महोत्‍सवात राबविण्‍यात येणार आहे. पद्मश्रींच्‍या जीवनाची वाटचाल नव्‍या पिढीला समजावी, सहकार चळवळीचेही महत्‍व आधोरेखित व्‍हावे या दृष्‍टीने शाळा, महाविद्यालयातून या विषयाचे सुसंगत असे देखावे तयार केले जाणार आहेत.

यासाठी सर्वच शाळा, महाविद्यालयांचे मुख्‍याध्‍यापक, प्राचार्य, विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करीत असून, सांस्कृतिक आणि क्रिडा महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी विशेष प्रयत्‍न करीत आहेत. यासाठी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्‍या गठीत करण्‍यात आल्‍या असून, गणपती प्राणप्रतिष्‍ठेची लोणी गावात निघणारी मिरवणूक या महोत्‍सवाचे मुख्‍य आकर्षण ठरणार आहे.

 

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!