23.7 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

देवभूमी प्रमाणेच संताची भूमी म्‍हणून अहिल्‍यानगरच्‍या भूमीची ओळख व्‍हावी- ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्‍ह्याचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन, कामही सुरु जिल्‍ह्याचा अध्‍यात्मिक कॉरीडॉर तयार करुन रोजगाराची इको सिस्‍टीम तयार करण्‍याचे उदिष्‍ठ

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-उत्‍तराखंडातील देवभूमी प्रमाणेच संताची भूमी म्‍हणून अहिल्‍यानगरच्‍या भूमीची ओळख व्‍हावी असा आपला प्रयत्‍न आहे. यासाठी जिल्‍ह्याचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन, कामही सुरु झाले आहे. जिल्‍ह्याचा अध्‍यात्मिक कॉरीडॉर तयार करुन रोजगाराची इको सिस्‍टीम तयार करण्‍याचे उदिष्‍ठ असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

शहरातील समर्थ प्रतिष्‍ठानने गणेश उत्‍सवा निमित्‍त सादर केलेल्‍या श्री.केदारनाथ धाम मंदिराच्‍या देखाव्‍याचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. तसेच नगर परिषदे तर्फे सुरु करण्‍यात आलेल्‍या कर मुल्‍यांकणास स्‍थगिती मिळवून दिल्‍याबद्दल नागरीकांच्‍या वतीने त्‍यांचा नागरी सत्‍कारही करण्‍यात आला. सामाजिक कार्यात योगदान देणा-या व्‍यक्ति आणि संस्‍थांनाही मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी समर्थ प्रतिष्‍ठाणचे निलेश कोते यांच्‍या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. गणेश उत्‍सवातून जपलेल्‍या धार्मिक परंपरेचा गौरवपुर्ण उल्‍लेख करुन लोकमान्‍य टिळकांना अभि‍प्रेत असलेला गणेश उत्‍सव साजरा करणारे अनेक गणेश मंडळ सामाजिक दायित्‍वाने चांगले काम करीत असल्‍याचे सांगितले.

विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्‍तराखंड मधील देवाच्‍या भूमीचा जसा कॉरीडॉर तयार केला. यातून या भागातील पर्यटणाला नव्‍या संधी मिळाल्‍या. त्‍यांच्‍या कार्याची प्रेरणा घेवूनच अहिल्‍यानगरची भूमी संतांची भूमी म्‍हणून अधिक ठळकपणे ओळखली जावी यासाठी आपण काम सुरु केले असून, याची सुरुवात श्रीक्षेत्र नेवासे येथून केली आहे. ज्ञानेश्‍वर सृष्‍टीच्‍या उभारणीसाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्‍यात आल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तालुक्‍यात एक अध्‍यात्मिक स्‍थान आणि संताचे अधिष्‍ठाण आहे. याचे महत्‍व लक्षात घेवून ही सर्व तिर्थस्‍थान विकास प्रक्रीयेशी जोडण्‍याचा आपला प्रयत्‍न आहे. अहिल्‍यानगर जिल्‍हा अध्‍यात्मिक कॉरीडॉर म्‍हणून भविष्‍यात ओळखला जाईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे उभारले जाणारे राष्‍ट्रीय स्‍मारक हे महिलांच्‍या सक्षमीकरणाचा संदेश देणारे ठरेले. या माध्‍यमातूनही जिल्‍ह्याचे पर्यटन आणि रोजगार निर्माणाची इको सिस्‍टीम तयार करण्‍याचे नियोजन केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शिर्डी शहराचे पावित्र्य राखण्‍याचे दायित्‍व सर्वांचेच आहे. शहरात अवैध धंद्याना पाठबळ मिळणे उचित नाही. या परिसरातील जागा, हॉटेल याचा रोजरोसपणे वापर अवैध धंद्यासाठी होणे म्‍हणजे या भूमीची बदनामी होण्‍यासारखी आहे. अशा अवैध धंद्यांना कोणीही पाठीशी घालू नका असे अवाहन करतानाच या अवैध व्‍यसायातील प्रवृत्‍ती आज गावापर्यंत आल्‍या आहेत. उद्या घरापर्यंत आल्‍यानंतर काय होईल याचा गांभिर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता असून, या विरोधात जे जे करावे लागेल त्‍यासाठी मी तुमच्‍या बरोबर आहे अशी ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमास माजी नगराध्‍यक्ष कैलास कोते, अभय शेळके, सभापती ज्ञानेश्‍वर गोंदकर, आप्‍पासाहेब कोते, बाबासाहेब कोते, गोपीनाथ गोंदकर, मधुकर कोते, विलास कोते, अॅड.अनिल शेजवळ, रमेश गोंदकर, ताराचंद कोते, विनायक कोते यांच्‍यासह कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी शहरातील जैन स्‍थानकात जावून पर्युषण पर्वाच्‍या निमित्‍ताने शुभेच्‍छा दिल्‍या. या पवित्र पर्वाच्‍या निमित्‍ताने आपल्‍या सर्वांना भेटण्‍याची संधी मिळाली हे माझे भाग्‍य समजतो असे सांगुन मुंबई येथे जैन समाजाच्‍या शैक्षणिक आणि वैद्यकीय प्रकल्‍पासाठी महसूल विभागाच्‍या माध्‍यमातून जागेची उपलब्‍धता करुन दिली असल्‍याची माहीती त्‍यांनी संवाद साधताना दिली.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!