नेवासा ( शहर प्रतिनीधी ):-सध्या नेवासा ते श्रीरामपुर या रस्त्याचे काम चालू आहे. नेवासा हद्दीमध्ये कॉन्ट्रॅक्टर ची रस्त्याच्या कामाकरिता नेमणूक केलेली आहे. नेवासा ते पाचेगाव या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला मोठमोठाली चिंचेची तसेच इतर झाडे सुमारे ५० ते ६० वर्षापासून आहे.
सदरचा रस्ता हा रुंदी करण करण्याच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरने व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करुन बेकायदेशिर रित्या रस्त्याच्या कडेला असणारी चिंचेची तसेच इतर झाडांची रस्ता रुंदीकरणाला कुठलीही अडचण नसतांनाही साईड पट्ट्याच्या पलीकडचे झाडे तोडीत आली आहेत. हि वृक्षतोड त्वरित थांबवावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी वृक्ष प्रेमी संघटनेने ढोल बजाव आंदोलन करत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे .



