spot_img
spot_img

कतली साठी नेणाऱ्या सात वासराची सुटका, श्रीरामपूर पोलिसांची कारवाई. पाच लाख दोन हजार मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर (प्रतिनिधी):-कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या सात गोवंशीय जिवंत वासरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करून सुटका केली आहे.या कारवाईत पोलिसांनी ५ लाख २ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक १६/०४/२०२३ रोजी दुपारी 12/30 वा. सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहू वाहन क्र. एम.एच. 04 जी.एफ. 8765 यामध्ये काही गोवंशीय वासरांना अशोकनगर ते श्रीरामपूरकडे अतिशय निर्दयतेने व कत्तल करण्याच्या उद्देशाने नेले जात आहे.पोलीस निरीक्षक गवळी यांनी तात्काळ अशोकनगर चौकीचे बिट अंमलदार पोहेकॉ संतोष परदेशी यांना माहिती देवुन सदर गाडीचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले.परदेशी यांनी सदर वाहनाचा हरेगाव फाटा ते शिरसगाव रस्त्याने शोध घेतला असता शिरसगाव शिवारातील इंदिरानगर येथील जगताप किराणा मॉलचे समोर वरील वर्णनाचे वाहन त्यांना जाताना दिसले. त्यावरील चालकास त्यांनी वाहन रस्त्याच्या बाजुला घेण्यास सांगितले. सदर चालकास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जावेद मुस्ताक कुरेशी, वय २५ वर्षे, रा. बजरंग चौक, वार्ड नं. २, श्रीरामपूर असे सांगितले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यात 2 हजार 800 रु. किंमतीचे काळया, पांढऱ्या, तांबडया रंगाची 7 गोवंशीय लहान वासरे त्यांना कत्तल करण्याच्या उददेशाने वाहनातुन घेवुन जात असताना मिळुन आली. म्हणुन त्यांनी सुमारे ५ लाख रुपये किंमतीच्या अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहू वाहनासह एकुण ५ लाख २ हजार ८०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करम्हणुन त्यांनी सुमारे ५ लाख रुपये किंमतीच्या अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहू वाहनासह एकुण ५ लाख २ हजार ८०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जावेद मुस्ताक कुरेशी याच्या विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. ला महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1955 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5,5 (अ), (ब), (क), 9(अ) सह प्राण्याना निर्दतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11 (ज) (च) (छ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. शरद अहिरे हे करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!