लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणांसोबतचं खेळाकडे विशेष लक्ष दिले जाते.यामुळे क्रिडा क्षेञातही प्रवरा अव्वल स्थानावर आहे.प्रवरेत होत असलेल्या सास्कृतिक महोत्सव आणि क्रिडा महोत्सव हा विद्यार्थ्यासह सर्वासाठी पर्वणी ठरत आहे असे प्रतिपादन माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवा अंतर्गत प्रवरा अभियांञिकी महाविद्यालयांमध्ये क्रीडा महोत्सवा अंतर्गतआयोजित खो-खो स्पर्धेचा उद्घाटन डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ,प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने,डाॅ.व्हि.आर.राठी, अर्जुन आहेर, क्रीडा संचालक डाॅ. प्रमोद विखे आदीसह प्राध्यापक स्पर्धक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील विविध शाळा महाविद्यालयांतील ८९ संघ सहभागी झाले होते.क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे क्रिडा अधिकारी सर्वश्री सुनील आहेर, सुनील गागरे, सुनील शेळके, बबन सातकर, प्रतीक दळे, अनिल शिंदे बाबा वाणी, अफजल पटेल आदींनी परिश्रम घेतले.



                                    