spot_img
spot_img

सुरेशनगर ( नेवासा)येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

_________________________
नेवासा फाटा( प्रतिनिधी: – नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सुरेशनगरच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच शैलाताई कल्याणराव उभेदळ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अतिशय उत्साही वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच शैलाताई उभेदळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र विषयी सांगताना असे म्हटले की त्यांनी सर्व समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशिक्षित व गरीब लोकांना जागरूक करण्याचे काम करत असताना त्यांच्यासाठी मूकनायक व बहिष्कृत भारत या साप्ताहिक मासिकाचे संपादन केले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित, बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यामुळे अशा या महान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी साजरी करावी असेही यावेळी सरपंच शैलाताई उभेदळ यांनी सांगितले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव पाषाण, उपसरपंच भागचंद पाडळे ,माजी सरपंच भगवानराव दळवी ,विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक कल्याणराव उभेदळ, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव खंडागळे, सतीश क्षीरसागर, विनोद निकाळजे, भिमा चव्हाण, बापूसाहेब उभेदळ, गणेश दळवी, सचिन मगर, विजय उभेदळ, अंगणवाडी सेविका राऊत, सुनिता उभेदळ, रंजना भोसले, छाया पाडळे, सारिका उभेदळ, कोमल निकाळजे, ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश उभेदळ, अजय खंडागळे, शाळेचे मुख्याध्यापक उदे गुरुजी, गायकवाड मॅडम, भगत मॅडम आदी व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!