माळवाडगाव (प्रतिनिधी) : –आर्ट ऑफ लिविंग  च्या वतीने श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मनाली गार्डन येथे आठ दिवसीय निवासी युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले . शिबिराचा समारोप प्रसंगी आचार्य शुभम महाराज यांनी युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
श्री श्री रविशंकर यांच्याविश्वकल्याणाच्या शुद्ध हेतू तून चेतनामय प्रकाशाला उत्साहित करणारी सुगंधी संस्था म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग असे उदगार आचार्य शुभम महाराजकांडेकर यांनी केले. विश्वाला नवीन चेतना देणारे फार महान विश्वरत्न श्री श्री रविशंकर यांच्या सानिध्यात आपण आहात हि फार भाग्यवान गोष्ट आहे. जिवन जगण्याची  शैली शिकवणारी  कला साकार करत युवा पिढी एकत्रित करत चांगले युवक घडवत आहे. तसेच जगभर श्री श्री रविशंकर यांचे कार्य चे शुभम महाराज यांनी कौतुक केले. या शिबिरास पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके व पोलीस पाटील संजय आदिक यांनी भेट देत युवकास मार्ग दर्शन केले. तसेच युवकांनी आपल्या त आठ दिवसांत झालेल्या बदल यांचे कथन केले असता त्याच्यात झालेला बदल पाहून मिटके साहेब यांनी कौतुक करत आपणास कोर्स करण्याची इच्छा प्रगट केली. आर्ट ऑफ लिविंग च्या इंटरनॅशनल टीचर रचना फासाटे यांनी श्रीरामपूर शहर  व ग्रामीण पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा चार दिवसीय हॅपिनेस कोर्स घेऊ असे आश्वासनदिले. शिबिरास अनेक मान्यवर व्यक्ती नी भेटदेत या शिबीराचे कौतुक केले. या शिबिरात युवकांना नेतृत्व कौशल्य, व्यक्तिमत्व विकास ,  युवकांना सक्षम बनविणे,, आत्मविश्वास वाढविने, योग, प्राणायाम 
प्रशिक्षण सध्याच्या नव युवकास समाज जागृती, विधायक वळण देत व्यसनमुक्ती ,तणावमुक्ती, हिंसामुक्ती, पर्यावरण संरक्षणयुवा प्रशिक्षण शिबिर घेण्याचा मुख्य उद्देश. आहे शिबिराच्या माध्यमातून प्रभावी निर्भिड नेतृत्व कौशल्य व्यक्तिमत्व विकास   सुदर्शन क्रिया  शिकवली  . परिसरातील खोकर मुठेवाडगाव माळवाडगाव खानापूर भामाठाण, कमलपुर, या गावी जाऊन ग्रामस्वच्छता अभियान राबवित योग प्राणायाम चे महत्व पटवून दिले.प्रशिक्षण शिबिरसाठी आर्ट ऑफ लिविंग चे ज्येष्ठ  डायनॅमिक योग प्रशिक्षक जयंतजी भोळे यांचे आठ दिवसाचे मोलाचे  मार्गदर्शन लाभले. या शिबिराचे आयोजन  श्रीरामपूर आर्ट ऑफ लिविंग परिवाराने केले होते. व पुन्हा एकदा युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 1 मे रोजी करण्यात आले आहे आशी माहिती आर्ट ऑफ लिविंग परिवार श्रीरामपूर यांनी दिली व शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले या वेळी पोलीस पाटील संजय आदिक माळवाडगाव,खोकर, वडाळा महादेव, माळेवाडी, खानापूर,भामठाण,कमलपूर व पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते
ह्या वयात मुले आपले शिक्षण,अभ्यास,ध्येय,सोडून प्रेमात पडतात आणी विसरून जातात आपल्या आई वडिलांनी आपल्या शिक्षणासाठी किती त्याग केला आहे म्हणून प्रेमात  पडायचे तर आई वडिलांच्या पडा त्यांच्या स्वप्नांच्या पडा -उपविभागीय पोलीस अधिकारी (श्रीरामपूर) – संदीप मिटके
युवकांनी समस्याच्या बाबतीत खूप विचार करू नका समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असते समस्यानं मध्ये अडकून बसण्या पेक्षा त्या समस्यानं वरून जाण्याचा प्रयत्न करा आणी आपले उद्दिष्ट,ध्येय,साकार करा – आचार्य शुभम महाराज कांडेकर



