spot_img
spot_img

हॉटेल आचाऱ्याची टणक हत्याराने मारहाण करून हत्या

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- हॉटेल आचाऱ्याची टणक हत्याराने मारहाण करून हत्या केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे घडली आहे.रामबहादुर धर्मदेव सौद वय ४७ (रा. पहलमानपुर ता. धनगडी जि. कैलाली, नेपाळ हल्ली रा. पाथर्डी ता. पाथर्डी )असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत रामबहादुर याचा मोठा भाऊ घनश्याम धर्मदेव सौद यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

रामबहादूर याचा मृतदेह पोलिसांना मिडसांगवीतून जाणाऱ्या कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या एका मटन शॉपच्या शेडमध्ये मृत अवस्थेत बुधवारी आढळून आला.रामबहादुर सौद हा हॉटेलमध्ये आचारी म्हणुन पाथर्डी या ठिकाणी व्यवसाय करत होता. दि. बुधवारी १८ सप्टेंबरला दुपारी एक वाजण्याच्या पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमानी अज्ञात कारणावरुन टणक हत्याराने राम बहादुर याच्या पाठीवर, दोन्ही पायाचे मांडीवर, पोटरीवर, पार्श्वभागवर जबर मारहान करून जिवे ठार मारुन खुन केला असुन रामबहादुर याला दारूचे व्यसन होते असेही फिर्यादीत नमूद केले आहे.

रामबहादूर याला आचारी असुन जिथे काम मिळेल तिथे हॉटेल मध्ये आचारी काम करुन तिथेच राहत होता.पाथर्डी पोलिसात गुरुवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतली असून त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहे.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!