8.8 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

आ.थोरात हे जनतेच्या मनामनातील नेतृत्व – एहसान खान डॉ.जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- १८८५  मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाला मोठी समृद्ध परंपरा आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे काँग्रेस पक्षाचे लोकनेते आ. बाळासाहेब थोरात हे राज्यातील जनतेच्या मनामनातील नेतृत्व असल्याचे गौरवउद्गार महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सह प्रभारी एहसान खान यांनी काढले आहे.

अमृतवाहिनी बँकेच्या सौ.मथुराबाई भाऊसाहेब थोरात सभागृहात संगमनेर तालुका युवक काँग्रेसची आढावा बैठक अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक किरण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सांगळे,सचिन खेमनर, शहराध्यक्ष निखिल पापडेजा, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी उपस्थित होते.

यावेळी बोलताना एहसान खान म्हणाले की, भाजप ही भांडवलदारांची मोठी ताकद असली तरी त्याविरुद्ध लढण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. समता बंधुता व मानवता हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र याला धर्मांध शक्ती तोडू पाहत आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये काम करायचे आहे.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कामातून राज्य व देश पातळीवर मोठी ओळख निर्माण केली आहे.शेतकरी, युवक,महिला, गोरगरीब या सर्वांच्या विकासासाठी सतत काम करणारा नेता हा त्यांचा लौकिक आहे.

सर्वसामान्य प्रति तळमळ घेऊन डॉ.जयश्री थोरात हा काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जात असून त्यांनी राज्यपातळीवर युवकांचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करताना येणाऱ्या विधानसभेत सर्वांनी आपल्यातील मतभेद विसरून काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले.

तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. पुरोगामी व वारकरी विचारांचा वारसा सांगणारा हा तालुका इतरांसाठी आदर्श ठरला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी पूर्ण तरुणाई उभी आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये राज्यामध्ये महिला व बालिका सुरक्षित नाही त्याचप्रमाणे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे सर्व रोखण्यासाठी सर्वांनी एक दिलाने उत्साहाने काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने काम करा असे आवाहन केले.

तर किरण पाटील म्हणाले की नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्वाचा संगम असलेले संगमनेर आहे. ही काँग्रेसच्या विचारांची भूमी आहे. संगमनेरने आ.बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने राज्याला सुसंस्कृत नेतृत्व दिले असल्याचे ते म्हणाले. यावेळी आनंद वर्पे, प्रदीप हासे, यांनी मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष सांगळे यांनी केले सूत्रसंचालन ओंकार बिडवे यांनी केले तर निखिल पापडेजा यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!