शेवगाव ( जनता आवाज वृत्तसेवा):-विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार असल्याने उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची याबाबत वरिष्ठांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार मोनिका राजळे असून भाजपमधूनच अनेक जण इच्छुक असल्यामुळे आता मोनिका राजळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार का? की ठिकाणी खांदेपालट होणार याकडे शेवगावकरांचे लक्ष लागून आहे. प्रताप ढाकणे यांच्या पाठोपाट आता चंद्रशेखर घुले यांनी निवडणुकीची तयारी केली असून निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात जनसंपर्क करत आहेत. मागील वेळी सर्व तयारी झाली होती मात्र ऐन वेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो. मात्र यावेळेस मतदार आपल्याबरोबर असून सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी इच्छुक आसल्याचे घुले कार्यकर्ते सांगतात.
दुसरीकडे जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस मतदार जनता हेच आपले तिखट आहे. मतदाराकडून मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा हर्षदाताई काकडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी काकडे यांनी मोठ्या प्रमाणात ताकत लावली असून यावेळी काकडे इतिहास घडवतील अशी सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा बघण्यास मिळत आहे.



