23.1 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक उत्कर्षाकरिता पेटविलेल्या क्रांती मशालीचे एक जनक – मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी दि.१४ (प्रतिनिधी):

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक उत्‍कर्षाकरीता पेटविलेल्‍या क्रांतीच्‍या म‍शालीचे एक जनक होते, या महान कर्तृत्‍ववान देशभक्‍ताने भारतीय घटनेच्या माध्यमातून देशात समानतेचं व सन्‍मानाचे कार्य बाबासाहेब कोणत्‍या एका विशिष्‍ट समाजाचे नेते नव्‍हते तर भारत देशातील समाजाचे नेतृत्‍व करणारे महापुरुष होते असे गौरवोद्गार महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले.

भारतीय संविधानाचे जनक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३२ जयंतीच्‍या निमित्‍ताने लोणी बुद्रूक व खुर्द येथील अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्रीअण्णासाहेब म्हस्के  पाटील,

जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्यक्ष सौ .शालिनीताई विखे पाटील, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे, जेष्‍ठनेते किसनराव विखे, माजी सिनेट सदस्‍य अनिल विखे, माजी सरंपच लक्ष्‍मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, सोसायटीचे चेअरमन अशोकराव धावणे यांच्‍यासह ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, भारत देशामध्‍ये अनेक महापुरुषांनी जन्‍म घेतला, समाजासाठी व देशासाठी पराकोटीचा संघर्ष केला. मानव जातीच्‍या कल्‍याण व उध्‍दरासाठी देशाच्‍या स्‍वातंत्र्यपुर्व व नंतरच्‍या काळामध्‍ये ज्‍या-ज्‍या महापुरुषांनी संघर्ष उभा केला त्‍या महापुरुषांच्‍या यादीमध्‍ये भारततत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वरच्‍या क्रमांकार घेतले जाते. एक गौरवशाली नेतृत्‍व भारत देशाला लाभलं. घटनेच्‍या आधारावर आज देश समृध्‍दीकडे वाटचाल करीत आहे, स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांच्‍या नंतरही घटनेची पुजा केली जात असून घटनेचा माध्‍यमातून शोषित आणि वंचितांना नवी उभारी देण्‍याचे महत्‍वपूर्ण काम डॉ. बाबासाहेबांच्या माध्यमातून झाले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे फक्‍त भाग नव्‍हते तर या सामाजिक उत्‍कर्षाकरीता पेटविलेल्‍या क्रांतीच्‍या म‍शालीचे ते एक जनक होते, या महान कर्तृत्‍ववान देशभक्‍ताने भारतीय घटनेचे शिल्‍पकार होवून देशात समानतेचं व सन्‍मानाचे कार्य करुन समाजाच नेतृत्‍व केले. डॉ.आंबेडकर कोणत्‍या एका विशिष्‍ट समाजाचे नेते नव्‍हते तर भारतातील सर्व समाजाचे नेतृत्‍व करणारे एक महापुरुष होते असेही ना.विखे पाटील म्‍हणाले. याप्रसंगी माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी किराणा किट व कपड्याचेही वितरण करण्यात आले.
लोणी खुर्द येथेही भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍ताने अभिवादन कार्यक्रम करण्‍यात आला यापंसंगी कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, राहुल घोगरे, मायकल ब्राम्‍हणे यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने ग्रामस्‍थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी सर्व संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!